लाइव न्यूज़
दहावी पुनर्रचित अभ्यासक्रम; साडेतीनशेपेक्षा अधिक उर्दू शिक्षकांना प्रशिक्षण
बीड, (प्रतिनिधी):- दहावीचा अभ्यासक्रम बदलल्याने पुनर्रचित अभ्यासक्रमासंदर्भात जिल्हा शैक्षणिक सातत्यपुर्ण व्यवसायिक विकास संस्थेतर्ंगत शिक्षकांसाठी प्रशिक्षण घेण्यात आले. सर्व माध्यमांसाठी झालेल्या प्रशिक्षणात तज्ञ व्यक्तीनीं शिक्षकांना सखोल मार्गदर्शन केले. शहरातील सर सय्यद अहेमद खान उर्दू शाळेमध्ये जिल्ह्यातील उर्दू माध्यमांच्या शिक्षकांसाठी ९ दिवस प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यामध्ये साडेतीनशे अधिक शिक्षकांना पुनर्रचित अभ्यासक्रमासाठी प्रशिक्षण देण्यात आले.
बीड शहरातील सर सय्यद अहेमद खान उर्दू शाळेमध्ये दहावी पुनर्रचित अभ्यासक्रम विषयी जिल्ह्यातील उर्दू माध्यमांच्या विषय शिक्षकांसाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. ९ दिवस झालेल्या प्रशिक्षणात जिल्हाभरातील शिक्षकांनी हजेरी लावली. विविध सुलभकांनी विषय तज्ञांनी उपस्थित शिक्षकांना अभ्यासक्रम बदलाविषयी सखोल मार्गदर्शन केले. त्यामध्ये सय्यद शफी, काझी अब्दुल मजीद, शेख इलियास, मिर्झा खालेद बेग, अब्दुल हमीद, काझी सर, अब्दुल हमीद खान, खतीब मिसबाहूल आबेदिन, मोमीन रोजिना, असरार अहेमद खान, शेख फतहूल मोबीन, महंमद मुखदीर गुलाम जिलानी, नुरुलसखलैन अंन्सारी, पठाण रियाज खान, इरफान सिद्धीकी, एजाज बेग, अनवर मसरुर, पठाण सिराज खान आदि सुलभकांचा समावेश होता. प्रशिक्षणा दरम्यान जिल्हा शैक्षणिक सातत्यपुर्ण व्यवसायिक विकास संस्था (डाएट) चे प्राचार्य विनोद देवगावकर यांनी दि.२१ एप्रिल रोजी प्रशिक्षणस्थळी भेट देवून आढावा घेतला. यावेळी त्यांनी उपस्थित विषय शिक्षकांशी अभ्यासक्रम बदलाविषयी चर्चा केली. त्याचबरोबर जिल्हा शैक्षणिक सातत्यपुर्ण संस्थेचे अधिव्याख्याता डॉ.योगेश यांनीही भेट देवून प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले.
ज्ञान रचनावादावर आधारित अभ्यासक्रम-मोहंम्मद इसाक
दहावीच्या अभ्यासक्रमात बदल झाला आहे. ज्ञान रचनावादावर आधारित अभ्यासक्रम तयार करण्यात आला असुन विद्यार्थ्यांना हसत-खेळत शिक्षण ही संकल्पना केंद्रस्थानी ठेवण्यात आली आहे. पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार उर्दू माध्यमाच्या जिल्हाभरातील विषय शिक्षकांना सुलभकांनी सखोल मार्गदर्शन केले आहे. त्या प्रशिक्षणावर आधारित शिक्षकांकडून अध्यापन केले जाणार असल्याची माहिती जिल्हा शैक्षणिक सातत्यपुर्ण व्यवसायिक विकास संस्था विषय तज्ञ मोहंम्मद इसाक यांनी दिली.
Add new comment