पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते बीडचे जिल्हाधिकारी एम. देवेंद्रसिंह यांचा सन्मान
बीड, (प्रतिनिधी):- प्रधानमंत्री फसल बिमा योजनेत सर्वोत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल जिल्हा प्रशासन प्रमुख जिल्हाधिकारी एम. देवेंद्रसिंह यांचा विज्ञान भवनात गौरव करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः मानचिन्ह देऊन जिल्हाधिकारी देवेंद्रसिंह यांना सन्मानित केले.
दिल्ली येथील विज्ञान भवनात नागरी सेवा दिनानिमित्त शनिवारी सायंकाळी 5 वाजता झालेल्या सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी प्रधानमंत्री फसल बिमा योजनेत चांगली कामगिरी केल्याबद्दल बीड जिल्हा प्रशासनाला उत्कृष्ट सार्वजनिक प्रशासनाचा प्रधानमंत्री अवार्ड देवून गौरविण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जिल्ह्याचे प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी एम. देवेंद्रसिंह यांना मानचिन्ह देवून सन्मानित केले. यावेळी जिल्हा कृषी अधिकारी चपळे हे देखील उपस्थित होते. सदर कार्यक्रमास मान्यवरांची उपस्थिती होती. देशातील जिल्ह्यांनी प्रधानमंत्री फसल विमा योजनेची नोंदणी केली होती. बीड जिल्ह्यातूनही प्रधानमंत्री फसल विमा योजनेतर्ंगत उत्कृष्ट कामगिरी झालेली आहे. सन 2016-17 मध्ये खरीप हंगामात जिल्ह्यातून 55 कोटी 46 लाख रुपयांची रक्कम विमा हप्त्यापोटी भरण्यात आली होती. त्याबदल्यात तब्बल 233 कोटी 84 लाख रुपयांचा निधी शेतकर्यांसाठी मिळाला होता. सन 2017-18 च्या खरीप हंगामात 63 कोटी 71 लाख तर रब्बी हंगामात 8 कोटी 44 लाख रुपयांच्या रक्कमेचा विमा भरणा करण्यात आला होता. त्याची दखल घेत जिल्हा प्रशासनाला गौरविण्यात आले आहे.
Add new comment