लाइव न्यूज़
भंगार खरेदी फसवणूकप्रकरणी सादेक फारोकी यांचा जामीन अर्ज फेटाळला
Beed Citizen | Updated: April 21, 2018 - 3:31pm
पुन्हा हार्सुल कारागृहात रवानगी
बीड, (प्रतिनिधी):- भंगार खरेदी प्रकरणात ३१ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यांमध्ये गुलाम सादेक फारोकी यांचा जामीन अर्ज औरंगाबाद न्यायालयाने चौथ्यांदा फेटाळला आहे. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता त्यांचा जामीन अर्ज फेटाळणे योग्य असल्याचे मत व्यक्त करत न्यायालयाने त्यांची हर्सुल तुरुंगात रवानगी केली आहे.
औरंगाबाद येथील सातारा पोलिस ठाण्यात असफाहान सिद्धीकी यांनी गुलाम सादेक फारोकी गुलाम सुब्हानी फारोकी (रा.बशिरगंज, बीड) यांच्या विरोधात २०१५ साली तक्रार दाखल केली होती. भंगार खरेदी प्रकरणात ३१ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. सातारा पोलिसांना तो नेहमी हुलकावणी देत होता. दरम्यान सादेक फारोकी यांनी आपल्या वकीलामार्फत हायकोर्ट व सुप्रीम कोर्टामध्ये जामीन मिळविण्यासाठी प्रयत्न केले. २७ मार्च २०१८ रोजी पोलिसांनी त्याची हर्सुल कारागृहात रवानगी केली होती. सादेक फारोकी यांनी जामीन मिळावा म्हणून औरंगाबाद न्यायालयात अर्ज दाखल केला होता. दि.१८ एप्रिल रोजी झालेल्या सुनावणीत मुख्य न्यायदंडाधिकारी न्या.एस.बी.पवार यांनी त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावत पुन्हा हार्सुल कारागृहात रवानगी केली
Add new comment