लाइव न्यूज़
समृद्ध जीवनच्या गुंतवणूकदारांचे जिल्हाकचेरीसमोर धरणे
बीड, (प्रतिनिधी):- समृद्ध जीवन फुड्स इंडिया लिमिटेड व मल्टीस्टेटमधील ग्राहक, गुंतवणूकदारांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरु केले आहे. फसवणूक प्रकरणानंतर सर्व गुंतवणूकदारांनी पैसे परत करण्याची मागणी केली असुन यासंदर्भात जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे.
बीड येथील समृद्ध जीवन फुड्स इंडिया लिमिटेड व मल्टीस्टेटमधील ग्राहक, गुंतवणूकदारांनी विघ्नहर्ता एकता सामाजिक न्यासच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन सुरु केले आहे. ग्राहक, गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळावेत, बीड शहरातील कंपनीच्या मालमत्तेची विक्री करुन पैसे अदा करण्यात यावे, शहरातील समृद्ध जीवनचे कार्यालय सुरु करावे, मॅच्युरिटी पुर्ण झालेल्या परंतु चेक बाउंस झालेल्या ग्राहक व गुंतवणूकदारांचे पैसे तात्काळ खात्यावर जमा करण्यात यावेत, समृद्ध जीवन कंपनीच्या एजंटवरती कसल्याही प्रकारचा गुन्हा नोंद करण्यात येऊ नये आदि मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले आहे. निवेदनावर अध्यक्ष नारायण गिरी, उपाध्यक्ष तारामती लाड, सचिव विमल खांडेकर, बबन गिरी, हनुमान शिंदे, जनाबाई मांडवे, सुनंदा घोंगडे, भारती कांबळे, मिरा सोंडगे, सुदाम कोळेकर, सुदामती शिंदे आदिंच्या स्वाक्षर्या आहेत.
Add new comment