लाइव न्यूज़
केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणी विशेष पोलीस तपास पथकाची स्थापना
Beed Citizen | Updated: April 10, 2018 - 4:52pm
नगर, (प्रतिनिधी):- अहमदनगरच्या केडगाव हत्या प्रकरणात तपास करण्यासाठी विशेष पथक स्थापन करण्यात आलीय. अप्पर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार यांच्या नेतृत्वाखाली ही एसआयटी स्थापन करण्यात आलीय. त्यात नगर तालुका वूीि मनीष कलवनिया, स्थानिक गुन्हेशाखा पोलीस निरीक्षक दिलीप पवार, सुनील पवार सायबर क्राईम शाखा, सुनील सबकळे पोलीस निरीक्षक तोपखाना पोलिस ठाणे यांची टीम तयार करण्यात आली आहे.
कोतवाली पोलीस निरीक्षक अभय परमार यांना तडकाफडकी निलंबित केल्यानंतर त्यांची जागी रमेश रत्नपारखी यांना पदभार देण्यात आला. दरम्यान, काल अटक करण्यात आलेल्या भाजप आमदार शिवाजी कर्डिलेंना आज पुन्हा कोर्टात करण्यात येणार आहे.
Add new comment