लाइव न्यूज़
जिल्हाधिकारी घेणार बैठक ; प्रश्न लवकरच मार्गी
Beed Citizen | Updated: April 10, 2018 - 3:32pm
बीड ( प्रतिनिधी ) शहरातील मोमीनपुरा - अशोकनगर ते बार्शी नाका या भागातील रस्ता रुंदीकरण प्रश्न मागील नऊ महिन्यापासून रखडला आहे. पालिकेतील अंतर्गत गटबाजी , जातीय राजकारण आणि सुडाची भावना यामुळे त्या परिसरातील नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यांनी या प्रश्नाची दखल घेतली असून जिल्हाधिकारी यांना बैठक घेवून त्याचा आढावा घेण्याच्या सूचना केल्याची माहिती भाजप नेते तथा जिल्हा विकास सनियंत्रण समिती दिशाचे सदस्य सलीम जहॉंगिर यांनी म्हटले आहे.
बीड शहरातील मोमीनपुरा - अशोकनगर - बार्शी नाका रस्त्याचे रुंदीकरण करण्याचे काम पालिकेने हाती घेतले होते. याबाबत जुलै २०१७ मध्ये जाहीर प्रगटनाद्वारे अतिक्रमणे काढण्याचे आवाहन केले होते. लोकांनी अतिक्रमण काढले मात्र काहींनी त्यात खोडा घातला आहे. पालिकेतील अंतर्गत गटबाजी , जातीय राजकारण आणि सुडाची भावना यामुळे त्या भागातील लोकांना वेठीस धरले जात आहे. गेल्या नऊ महिन्यापासून रस्ता रुंदीकरण आणि नाली बांधकाम न झाल्याने या परिसरातील महिला , नागरिक आणि विद्यार्थी यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर सर्वत्र दगड - गोटे आणि नाल्यांचे पाणी असल्याने लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. याप्रश्नी भाजा नेते तथा जिल्हा विकास सनियंत्रण समिती दिशाचे सदस्य सलीम जहॉंगिर यांनी पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांची भेट घेवुन सदरील रस्ता रुंदीकरण कामात लक्ष घालून हा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याची मागणी केली.यावेळी त्यांच्यासमवेत भाजप जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे , सभापती संतोष हंगे , स्वप्नील गलधर, चंद्रकांत फड आदींची उपस्थिती होती. त्यावर मोमीनपुरा - अशोक नगर रस्त्याप्रश्नी ना. पंकजाताई यांनी तातडीने दखल घेतली. यासंदर्भात जिल्हाधिकारी यांना बैठक घेवून रस्ता रुंदीकरण कामाबाबत झालेल्या प्रक्रियेचा आढावा घेण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या कार्यलयात लवकरच मोमीनपुरा- अशोकनगर - बार्शी नाका रस्ता रुंदीकरण प्रश्नी बैठक होणार असल्याचे सलीम जहॉंगिर यांनी सांगितले आहे. पालकमंत्री ना. पंकजाताई यांनी याप्रश्नी लक्ष घातल्याने लवकरच या मार्गाचे रुंदीकरण होईल असा विश्वास भाजप नेते तथा जिल्हा विकास सनियंत्रण समिती दिशाचे सदस्य सलीम जहॉंगिर यांनी म्हटले आहे.
Add new comment