लाइव न्यूज़
मांजरा धरणातील पाणी बेकायदेशीररीत्या नदीपात्रात
केज, (प्रतिनिधी):- मांजरा धरणातील पाणी अवैधरीत्या नदीपात्रात सोडले असुन पाणी वाटप समितीची बैठक न घेता कागदोपत्री बैठक दाखवुन धरणातील पाणी नदीपात्रात सोडले असुन फक्त लातुरकरांच्या फायद्यासाठी हे पाणी सोडले असुन याच्या विरोधात कोर्टात दाद मागणार असल्याचे बजरंग सोनवणे यांनी सांगितले.
पाणी सोडायचे असेल तर ते कालव्याद्वारे सोडले जावे, तसेच पाणी वाटप समितीची बैठक झाल्याशिवाय ते सोडले जावू नये.यामुळे बीड व उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकर्यांचे नुकसान होत आहे.
पाणी वाटप समितीची बैठक केवळ कागदोपत्री दाखवून नदीपात्रात पाणी सोडले गेले तसेच केज मतदारसंघाच्या आमदार संगिता ठोंबरे ह्यादेखील आपल्या भागातील शेतकर्यांचे हीत न पाहता पक्षश्रेष्ठी व मंत्र्यांच्या दबावापुढे झुकत असुन कागदोपत्री घेतल्या जाणा-या बैठकांना मुक संमती देत असल्याने शेतकरी वर्गातून नाराजीचा सुर उमलत आहे.
या सर्व प्रकाराच्या विरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचे पाणीवाटप समितीचे सदस्य बजरंग सोनवणे यांनी सांगितले.
Add new comment