राहुल गांधी पवारांनी इंजेक्शन दिल्यानंतरच बोलतात: अमित शहा

मुंबई (प्रतिनिधी):: काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल गांधी हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी इंजेक्शन दिल्यावरच बोलतात. आमच्याकडे राहुल गांधी तीन वर्षांचा हिशेब मागतात. पण त्यांच्या चार पिढ्यांनी काय केले? हे आधी सांगावे, असा हल्लाबोल भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी केला. त्याचबरोबर कोणतेही आरक्षण भाजप बंद होऊ देणार नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिले.

आज मुंबईतील बीकेसी येथे भारतीय जनता पक्षाच्या ३८व्या स्थापनादिनानिमित्त भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह कॅबिनेटमधील मंत्री आणि महाराष्ट्रभरातून आलेले कार्यकर्ते यात उपस्थित होते.

भाजपने महाराष्ट्रात सत्तेत आल्यानंतर या प्रकारचा पहिलाच मेळावा आयोजित केला. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली. त्या पार्श्वभूमीवर भाजपच्या या मेळाव्याकडे आगामी निवडणुकांची पूर्वतयारी म्हणूनच पाहिले जात आहे.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.