लाइव न्यूज़
आघाडीमुळे दर्जेदार विकास कामे -पटेल
बीड, (प्रतिनिधी): कुठल्याही कामाचे श्रेय घेण्यासाठी आणी प्रसिद्धी साठी हपापलेल्या बीडच्या फेकू नगराध्यक्षानी आयत्या पिठावर रेगोट्या मारू नयेत ,जनाची नाही मनाची तरी बाळगावी .जिल्हा रुग्णालयात ते बशीरगंज भाजी मंडई ते सुभाष रोड आणा भाऊ साठे चौक ते बिंदुसरा नदी पर्येंत रस्ता नालीचे काम काकु नाना विकास आघाडी मुळेच मार्गी लागले .पंचवीस वर्षात कधी झाला नाही असे दर्जेदार विकास कामे आघाडीने करून घेतली.दिलीत वस्ती सुधार योजने अंतर्गत सदरील कामे होत असताना स्थानिक
आमदार ,नगराध्यक्ष यांनी आपलीच लाला म्हणत टिमकी वाजवू नये , थोडी तरी बाळगावी .जनतेला गेल्या पंचवीस वर्षा पासून वेड्यात काढलं आता जनता नगराध्यक्ष ,स्थानिक आमदार याना उघडी पाडेल असे काकू नाना विकास आघाडीचे गटनेते फारूक अली पटेल यांनी प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे.
बीड जिल्हा रुग्णालयात ते बशीरगंज ,थोरातवाडी ते भाजी मंडई रस्त्याचे काम दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत करण्यात आले. याला कोणी कुठल्या आमदाराने निधी दिला नाही ,आज जेकी स्वतःची श्रेया साठी पाठ थोपटून घेत आहेत, त्यांनी तरी जनाची नाही मनाची तरी बाळगावी. २०१५- १६ मध्ये सदरील रस्याचे काम मंजूर झाले तेव्हा नगराध्यक्षा दुधाळताई तर या भागाच्या नगरसेविका कागदे ताई होत्या,तेव्हा दलित वस्ती सुधार योजने मध्ये या
कामांचा समावेश झाला.पालिकेत आघाडीचे सभापती असताना या कामना गती मिळाली. हा रस्ता डांबरी होता त्यास सीमेंट कॉंक्रेट करण्याचा ठराव मी स्वतः मांडला ,त्यास सभागृहात सर्वांनी अनुमोदन दिले.सदरील डांबरी रस्ते सिमेंट चे करण्यासाठी संबंधित गुत्तेदाराशी चर्चा करून पंचवीस वर्षात कधी असे रस्ते झाले नाहीत असे दर्जेदार कामे आघाडीच्या नगरसेवक यांनी करून घेतले. मागच्या अनेक वर्षात मात्र नगराध्यक्ष यांनी बोगसगिरीच करत शहराच फार वाटोळं केलं.ज्यांनी कधी शहराचा विकास करायचा नव्हता त्यांना मात्र काकु नाना विकास आघाडीने जिल्हा रुग्णालय ते बशीरगंज ,सुभाषरोड रस्ता नालीचे काम दर्जेदार करून घेतल्या नंतर चांगल्याच मिरच्या झोबल्या.आघाडी मुळे कधी नव्हे बीडच्या इतिहासात अशी दर्जेदार विकास कामे झाली असल्याची आणी होणार असल्याचा विश्वास जनताच व्यक्त करू लागली आहे. त्यामुळे नगराध्यक्ष यांना पोटसुल उटल आणी आयत्या पिठावर रेगोट्या मारण्याचा काम फेकू नगराध्यक्ष ,स्थानिक आमदार यांनी केलं .जनाची नाही मनाची न बाळगणार्या नगराध्यक्षा यांना जनताच धडा शिकवेल असेही पत्रकात पटेल यांनी म्हटले आहे.
Add new comment