लाइव न्यूज़
आ. विनायक मेटे यांची जिल्हाधिकार्या समवेत बैठक
अल्पसंख्याक मुलींच्या वसतीगृहाचा प्रश्न मार्गी लागणार
बीड :(प्रतिनिधी) बीड येथे अल्पसंख्यांक समाजातील मुलींना शिक्षणाची उत्तम सुविधा उपलब्ध होण्यासाठी मुलींचे वसतीगृह अनेक दिवसापासुन मंजुर आहे. परंतू बीड शहरात योग्य जागा मिळत नसल्यामुळे आजपर्यंत हा प्रश्न प्रलंबीत आहे. मुस्लीम समाजातील मौलवी व प्रतिष्ठित मुस्लीम बांधवांनी आ. विनायकराव मेटे यांची भेट घेवुन हा प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली होती. त्या नुसार मागील पंधरवाडयात अल्पसंख्यांक विकास मंत्री मा. ना. विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली व संबंधित वरिष्ठ अधिकारी व मुस्लीम बांधवांचे एक शिष्टमंडळ यांची संयुक्तीक बैठक आ. विनायकराव मेटे यांच्या प्रयत्नाने संपन्न झाली. ना. विनोदजी तावडे यांनी वरिष्ठ अधिकारी व जिल्हाधिकारी बीड यांना या वसतीगृहासाठी तातडीने जागा उपलब्ध करुन देण्यासाठी सुचना केली होती. या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांच्या दालनात मुस्लीम समाजाचे शिष्टमंडळ व संबंधित अधिकारी यांच्या समवेत आ. विनायक मेटे यांनी बैठक घेतली. मुस्लीम बांधवांच्या मागणी नुसार शहरातील खासबाग किंवा डाक बंगला येथील उपलब्ध २ एकर जागेचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनामार्फत शासनाकडे पाठवण्याचे ठरले. येत्या१३ तारखेला बीड नगर पालिकेच्या जि.बी. मध्ये हा प्रस्ताव मांडण्यात यावा. व मुस्लीम मुलींच्या वसतीगृहासाठी लागणारी जागा येत्या १५ दिवसात निश्चिती करून हा रितसर प्रस्ताव शासनाकडे पाठवावा अशी सुचना जिल्हाधिकारी यानी बीड नगर परिषदेच्या अधिकार्यांना दिली आहे.
जिल्हा प्रशासनाकडून या वसतीगृहाच्या जागेचा प्रश्न सोडवण्यासाठी तातडीच्या हालचाली सुरू झाल्या असुन हा प्रश्न लवकरच मार्गी लागेल असा विश्वास आ. विनायक मेटे यांनी व्यक्त केला आहे. या वेळी खालेद पेंटर, मोईन मास्टर, फारुक पटेल, मौलाना जाकेर, जुनेद खान, अझरभाई, मुफती साहेब, मुज्जफर चौधरी, इमरान जागिरदार , डॉ. राजेंद्र बंड, बीड नगर परिषदेचे अधिकारी व इतर संबंधीत विभागाचे अधिकारी उपस्थित होत.
Add new comment