लाइव न्यूज़
जिल्हा रूग्णालयातील दाईंना वसुली भोवली!
Beed Citizen | Updated: April 4, 2018 - 3:35pm
बीड, (प्रतिनिधी):- येथील जिल्हा रूग्णालयातील दाईंकडून ३०० ते ५०० रूपयांची अनाधिकृत वसुली होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. याप्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ.सतिष हरिदास यांना चौकशीचे आदेश दिले होते. चौकशीनंतर जिल्हाशल्यचिकित्सकांनी चार दाईंच्या तडकाफडकी बदल्या केल्याने खळबळ उडाली आहे.
बीड येथील जिल्हा रूग्णालयात काही महिला कर्मचारी प्रसृती वार्डमध्ये महिला रूग्णांकडून अनाधिकृतपणे पैसे घेत असल्याची तक्रार जिल्हा शल्यचिकित्सांकडे करण्यात आली होती. सदरील प्रकार चव्हाट्यावर आल्यानंतर डॉ.अशोक थोरात यांनी याप्रकरणात चौकशीचे आदेश दिले होते. महिला रूग्णांकडून प्राप्त तक्रारींची चौकशी केल्यानंतर आज दुपारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी चौघींच्या तडकाफडकी बदल्या केल्या आहेत. यामध्ये दोन दाईंची ग्रामीण रूग्णालय माजलगाव तर अन्य दोघींची केज उपजिल्हा रूग्णालयात बदली करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
Add new comment