लाइव न्यूज़
विकास कामासाठी सहकार्य करा- डॉ.भारतभूषण क्षीरसागर
बीड दि.०३ (प्रतिनिधी) ः- गेल्या दोन वर्षापासून मास्टर प्लॅन अंतर्गत रस्ता रूंदीकरणाचे काम केवळ अतिक्रमण न काढल्यामुळे प्रलंबीत राहीले. काम सुरू झाल्यानंतर अनेकांनी या कामासाठी सहकार्य केले असून तसेच सहकार्य अतिक्रमण न काढलेल्या लोकांनी करावे जेणे करून या भागाचा विकास होईल विकास कामासाठी सहकार्य करा असे आवाहन नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी केले.
मंगळवार दि.०३ रोजी बलभिम चौक ते जुना बाजार रस्ता व नाली बांधकामाचा शुभारंभ नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी नगरसेवक जलीलखान पठाण, सतीश पवार, राजु पठाण, वाजेद पठाण, साजेद पठाण, हमीद चाऊस, विशाल मोरे, जफ रभाई, समीरभाई, शेख अनीस, मैनोद्दीन पेंटर आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना डॉ.क्षीरसागर म्हणाले की शहरातील रस्ता रूंदीकरणाचे काम सुरू असून मास्टर प्लॅल अंतर्गत कारंजा, बलभिम चौक,धोंडीपुरा, माळीवेस हे काम पुर्ण झाले. याच कामाबरोबर बलभिम चौक ते जुना बाजार वेस हे काम सुरू होते मात्र या ठिकाणी स्थानिक रहिवाश्यांनी सहकार्य करणे अपेक्षीत होते त्यांच्या न्याय मागण्यासाठी नगर पालिकेने सकारात्मक भूमिका घेतली आहे असे असतांना हे काम प्रलंबीत राहीले. काम सुरू असतांना अनेक रहिवाश्यांनी स्वत: हून सहाकार्य केल्यामुळे ज्या ठिकाणी जागेचे रूंदीकरण झाले आहे त्याठिकाणी नाली बांधकाम व रस्त्याचे डांबरीकरण करून घेणे गरजेचे झाले आहे. ज्या नागरीकांनी अद्यापही अतिक्रमीत जागा रिकामी केली नाही त्यांनी ती तातडीने रिकामी करावी जेणे करून चालू असलेल्या कामात ते ही काम पुर्ण होईल. विकास कामासाठी नागरीकांनी सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी केले.
Add new comment