लाइव न्यूज़
परळी मतदारसंघ विकासाने आणि चागल्या विचाराने सजवणार- ना.पंकजाताई मुंडे
बीड- (प्रतिनिधी) आई वडील आपल्या मुलाला चागले विचार,संस्कार देऊन मोठे करतात. मोठा झाल्यावर तो आई वडिलांना सांभाळतो हा परळी मतदारसंघ माझी आई आहे, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आज मी या पदावर आहे त्यामुळे या माझ्या परळीचा विकास करण्यासाठी मी मुलगी या नात्याने नुसती साडी नाही तर पैठणी घेऊन आले आहे. माझ्या विकासाच्या बाबतीत ङ्गाटक लुगडं असणार्या परळीला मी विकासाने आणि चागल्या विचाराने सजवणार असल्याचे मत ना.पंकजाताई मुंडे यांनी गाव तिथे विकास दौर्याच्या दुसर्या दिवशी मालेवाडी येथे व्यक्त केले.
राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी गांव तिथे विकास दौ-याला आज मालेवाडी तांडा येथून सुरू झाला.आज दौर्याचा दुसरा दिवस आहे.खर्या अर्थाने वर्षनुवर्षं विकासापासून कोसोदूर असणार्या वाड्या, वस्त्या,तांड्यावर ना.पंकजाताई मुंडे यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून त्यांना विकासाच्या प्रवाहात आणल्याचे चित्र दिसुन येत आहे. गावागावात लोक त्यामुळे आपल्या लाडक्या लेकीचे स्वागत करून आभार व्यक्त करत आहेत.
यावेळी पुढे बोलताना ना. पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, सामान्य माणसाच्या दारापर्यंत विकास गेला पाहिजे हे लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब नेहमी सांगायचे, त्यांचे अधुरे काम मला पूर्ण करायचे आहे. त्यासाठी मी दिवस रात्र काम करत आहे. या परळी मतदारसंघात याआधी विकास कामे ङ्गक्त कागदावर झाली ती तुमच्या आमच्या पर्यंत पोहोचलीच नाही. पण आता तसे होणार नाही ज्या गावाला जाण्यासाठी रस्ता नव्हता अश्या गावात आता घरापर्यंत रस्ते करण्यात आले आहे. मी आज विकास दौरा सुरू केला तो भाषण किंवा भूलथापा मारण्यासाठी सुरू केला नाही तर तुमच्याशी बोलण्यासाठी,तुमच्या अडचणी समजून घेण्यासाठी आणि मी तुमच्यासाठी काय केलं हे सांगण्यासाठी सुरू केला आहे. विकासाचे भरलेले ताट मी तुमच्या दारात-घरात आले आहे. त्यामुळे या विकासापासून कुणीही वंचित राहणार नाही असा शब्द मी तुम्हाला देते. कागदावर नाहीतर डोळ्याला दिसेल असा खरा विकास मी तुमच्या पर्यंत आणला आहे. त्यामुळे परळीचा विकास कुठेच थांबणार नाही. तुमची साथ अशीच माझ्या पाठीशी खंबीरपणे असेल तर मी कोणताही आणि कसलाही संघर्ष करण्यास माझी तयारी असल्याचे त्या म्हणाल्या..
यावेळी ता.अध्यक्ष शिवजीराव गुट्टे,सुधाकर पौळ, श्रीहरी मुंडे, गयाताई कराड, बिभीषण ङ्गड, माधव दहिङ्गळे, रवी कांदे, वैशाली बदने आदी उपस्थित होते.
Add new comment