पालकमंत्री शिंदेंमुळे जामखेडमध्ये प्रभारीराज; शिवसेनेचा रास्ता रोको

मंत्री शिंदेंच्या त्रासाला कंटाळून अधिकारी तालुक्यात टिकत नाहीत- भोसले
जामखेड, (प्रतिनिधी):- तालुक्याच्या प्रमुख  शासकीय कार्यालयात कायमस्वरूपी अधिकारी नाहीत या प्रभारीराजला  पालकमंत्रीच जवाबदार आहेत. पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांच्या त्रासाला कंटाळूनच शासकीय अधिकारी तालूक्यात टिकत नाहीत असा घणाघाती आरोप  शिवसेनेचे तालुकाप्रमुख शहाजीराजे भोसले यांनी केला. 
शिवसेनेच्या शेतकर्‍यांसह सामान्य माणसाच्या  विविध मागण्यांसाठी आज दि.३ एप्रिल रोजी शिवसेना तालुकाप्रमुख शहाजी राजेभोसले यांच्या नेतृत्वाखाली खर्डा चौक येथे रस्ता रोको आंदोलन आंदोलन करण्यात आले.  
या वेळी शिवसेना तालुका प्रमुख शहजी राजेभोसले, उपप्रमुख मोहन जाधव, शिवसेना युवा नेते लक्ष्मण कानडे, आंकुश उगले, संतोष वाळुंजकर, कैलास जाधव, हिंन्दुराज मुळे,  राहुल उगले, युवा सेवा उपप्रमुख संदिप भोरे, राजु पाचारे, शेतकरी संघटनेचे रावसाहेब खोत, भिमराव लेंडे, अप्पा मोहळकर,अप्पा कुमटकर, प्रवीण पोते सह शेकडो शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.              
या वेळी शिवसेनेचे पदाधिकारी व शेतकर्यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त करताना म्हणाले की जामखेड तालुक्यात या वर्षी पावसाचे प्रमाण जास्त झाल्याने शेतकर्‍यांनी मोठया प्रमाणात खरिपातील तूर, उडीद, हरबरा आदि नगदी पिके मोठ्या प्रमाणात घेतले आहे, शेतकर्‍यांना हमी भाव मिळावा म्हणून शासनाने चालू वर्षापासून हरबारा केंद्र सुरू केले आहे हे करत असताना जामखेड हे दळणवळणाचे ठिकाण असल्याने हरभरा खरेदी केंद्र जामखेड येथेच सुरू करण्याची आवश्यक असताना राजकीय कार्यकर्त्यांची  ची मर्जी राखण्यासाठी हे खरेदी केंद्र जाणीवपूर्वक खर्डा येथे सुरू करण्यात आले. 
जामखेड शहराचा वाढता विस्तार व हे जामखेड तालुका मराठवाड्याच्या सरहद्दीवर असल्याने येथे मोठ्या प्रमाणात वहातूक होत  आहे याच कारणामुळे शहरातील जागेचे भाव गगनाला भिडले आहेत त्यामुळे सर्व सामान्य माणूस व्यवसायासाठी जागा घेऊ शकत नाही त्यामुळे सुशिक्षित बेकार तरूणाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे येथे रस्तालगत अनेक शासकीय विभागाच्या मालकीच्या जागेमध्ये हे सुशिक्षित तरूण रस्त्यालगत व्यवसाय करत होते परंतु प्रशासनाने अतिक्रमण च्या नावाखाली शहरातील काही भागातील अतिक्रमण काढलेली आहेत त्यामुळे हे तरूण रस्त्यावर आले आहेत या गोष्टीचा विचार करता शासनाच्या मालकीच्या नवीन बसस्थानक परिसर, जुने बस्थानक परिसर , खर्डा चौक, येथील जिल्हा परिषदच्या व ग्रामीण रुग्णालया समोरच्या  जागेमध्ये शॉपिंग सेंटर उभारून सुशिक्षित बेकार तरूणांचे पूर्नवसन करण्यात यावे. तसेच सतत खंडीत होणारा विज पुरवठा व कमी दाबाने मिळणारा विज पुरवठा यामुळे पाणी असताना विजेच्या अभावी पिकं जळून गेली आहेत याचा विचार करता सततचे होणारे भारनियमन कमी करण्यात यावे पालकमंत्री राम शिंदे यांनी कूकडीच्या पाण्याचे टिमके न वाजवता ते प्रत्यक्षात आणावे तसेच तालुक्यातील शासकीय कार्यालयात प्रमुख आधिकारी नसल्याने शेतकरी व सामान्य जनतेला होणारा त्रास लवकर कमी करा करावा आदि मागण्या आंदोलनन कर्त्यांच्या वतीने करण्यात आल्या.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.