लाइव न्यूज़
शाहीन स्कॉलरशिप ग्रुपच्या परिक्षेस ९८ विद्यार्थ्यांची उपस्थिती
बीड, (प्रतिनिधी):- कर्नाटक येथील शाहीन स्कॉलरशिप ग्रुपच्यावतीनेे अल्पसंख्याक समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी नीट २०१८ पुर्व तयारीसाठी आज येथील मिल्लीया शाळेमध्ये परिक्षा घेण्यात आली. बीडसह उस्मानाबाद जिल्ह्यातील ९८ विद्यार्थ्यांनी ही परिक्षा दिली असुन उर्दू, सेमी आणि इंग्रजी या माध्यमातील विद्यार्थ्यांचा त्यामध्ये समावेश होता.
बीड येथील मिल्लीया शाळेत आज झालेल्या शाहीन स्कॉलरशिप ग्रुपच्या परिक्षेस ९८ विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. या ग्रुपच्यावतीने परिक्षा घेऊन त्यातील गुणवंत विद्यार्थ्यांची नीट २०१८ परिक्षेची पुर्व तयारी करुन घेण्यात येणार आहे. पुणे, औरंगाबाद आणि मुंबई येथे त्यांच्या शिकविणीची व्यवस्था मोफत करण्यात आली असुन राहणे व जेवणाचीही व्यवस्था ग्रुपच्यावतीने करण्यात आलेली आहे. आज झालेल्या परिक्षेतून उत्तीर्ण होणार्या विद्यार्थ्यांना नीट २०१८ परिक्षेच्या पुर्व तयारीसाठी मोफत प्रवेश दिले जाणार आहे. बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना कर्नाटकमध्ये जाऊन ग्रुपची परिक्षा देणे अडचणीचे होते. यासंदर्भात अंजुमन इशात ए तालीमच्या सचिव खान सबिहा बेगम यांनी शाहीन ग्रुपशी संपर्क करुन बीडमध्ये परिक्षा केंद्र देण्याची विनंती केली होती. त्यानुसार उस्मानाबाद आणि बीडसाठी मिल्लीया शाळेचे परिक्षा केंद्र देण्यात आले होते. यावेळी पर्यवेक्षिका सिद्दीकी रोझीना बाजी, प्रा.अब्दुल सत्तार, महंमद इरफान सिद्दीकी यांनी काम पाहिले.
Add new comment