बीड जिल्ह्यातून तिघे हद्दपार

बीड, (प्रतिनिधी):- फसवणूक करणे, अपहरण करणे आणि सरकारी नोकरदारावरील हल्ला प्रकरणासह अन्य स्वरुपाचे गुन्हे दाखल आहे. या प्रकरणी  असलेल्या तिघांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. पोलिस अधिक्षक जी.श्रीधर यांनी तिघांना बीड जिल्ह्यातून एका वर्षांसाठी हद्दपार केले आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, धारुर तालुक्यातील गावंदरा येथील भाऊसाहेब भानुदास राठोड, मधुकर भानुदास राठोड व विजय भाऊसाहेब राठोड यांच्याविरुद्ध फसवणूक, अपहरण, सरकारी कर्मचार्‍यांवर हल्ला करणे, मारहाण करुन जखमी करणे वगैरे स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. यामध्ये भाऊसाहेब विरुद्ध ७, मधुकरविरुद्ध ४ तर विजय राठोडविरुद्ध ३ गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणी पोनि.गंधम यांनी तिघांच्या हद्दपारीचा प्रस्ताव पाठवला होता. त्यामध्ये उपविभागीय अधिकारी मंदार नाईक यांनी हद्दपार प्रस्तावाची चौकशी करुन तिघांना तीन जिल्ह्यांतून हद्दपार करण्याबाबतची शिफारस केली होती. यासंदर्भात पोलिस अधिक्षक जी.श्रीधर यांनी तिघांना बीड जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार केले आहे.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.