मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबीराची तयारी पुर्ण- आ.जयदत्त क्षीरसागर
बीड,(प्रतिनिधी) ः- येथील काकू- नाना प्रतिष्ठानच्या वतीने विठाई हॉस्पिटल जालना रोड, बीड येथे दि.५,६,७ एप्रिल २०१८ रोजी घेण्यात येणार्या मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबीराची तयारी जवळपास पुर्ण झाली असल्याची माहिती आ.जयदत्त क्षीरसागर यांनी दिली.
या शिबीरासाठी पद्मश्री डॉ.तात्यासाहेब लहाने (सहसंचालक वैद्यकीय शिक्षण व संशोधन महाराष्ट्र राज्य) व डॉ. रागीणी पारीख (नेत्र विभाग प्रमुख जे.जे. रूग्णालय, मुंबई) तसेच तेथील १० डॉक्टरांचा चमू सर्व ३६ सहकार्यासह दि.४ एप्रिल रोजी बीड येथे मुक्कामी येत असून दि.५ रोजी रूग्णांची तपासणी करण्यात येऊन पात्र रूग्णांना दि.५ रोजी ऍडमिट करण्यात येईल व ऑपरेशन पूर्व सर्व तपासण्या केल्या नंतर दि.६ व ७ एप्रिल रोजी दररोज २५० रूग्णांची शस्त्रक्रिया करण्यात येणार असून जानेवारी २०१७ रोजीच्या महाआरोग्य शिबीरामधील पात्र रूग्णांची ही शस्त्रक्रिया या शिबीरामध्ये करण्यात येणार आहे.
शनिवार दि.३१ मार्च २०१८ पासून जिल्हा रूग्णालयातील नेत्र तज्ज्ञाकडून बीड विधानसभा मतदार संघातील व लगतच्या गावातील रूग्णांची तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा रूग्णालयातील नेत्रविभाग प्रमुख डॉ.पाटील व डॉ.जाजू हे संबंधीतांना प्रशिक्षण देऊन पुढील कामास सुरूवात करणार आहेत.
या शिबीराचे आयोजन करण्याकरिता विठाई हॉस्पिटलचे डॉ.श्रीहरी लहाने सहकार्य करणार असून बीड येथील नेत्रतज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ.के.डी.पाखरे, डॉ.वनिता उन्हाळे, डॉ.भागवत मोटे, डॉ.राजेंद्र वीर, डॉ.सरडे, डॉ.नारायण आळणे, डॉ.पवार, डॉ.एस.एस.राठोड, डॉ.दिनकर घुगे, डॉ.प्रिती जाजू, डॉ.राधेश्याम जाजू, डॉ.वसूधा जाजू, डॉ.उज्वला काशिकर, डॉ.प्रदिप सानप, डॉ.रजनी मार्कड, डॉ.सुरेश ठोंबरे यांचे सहकार्य लाभणार आहे.
रोटरी क्लब बीडच्या वतीने सर्व रूग्णांना जेवणाची मोङ्गत व्यवस्था करण्यात येत असून हे शिबीर पार पाडण्याकरिता अनेक सेवाभावी संस्था पुढे येत आहेत. ङ्गार्मासिस्ट असोशिएशन तर्ङ्गे रूग्णांना औषधी देण्यात येणार आहेत तसेच व्यापारी संघटनांनी सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे या शिबीरासाठी वेगवेगळ्या समित्यांचे गठण करण्यात आले असून नगर परिषद बीड कडून स्वच्छता व पाणी पुरवठा करण्यात येत आहे. वाहतुक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी पोलिस नियंत्रण कक्षाकडून सहकार्य घेेण्यात येणार आहे.
Add new comment