पालिकेतील एमआयएमचे पदाधिकारी म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे!
रस्त्याचे काम रोखण्याचा प्रयत्न, सत्ताधारी असुनही म्हणाले इस्टीमेट दाखवा!
बीड, (प्रतिनिधी): नगर पालिकेतील एमआयएमच्या पदाधिकार्यांनी सुभाष रोड, माळीवेस येथील काम रोखण्याचा प्रयत्न केला. कामाच्या गुणवत्तेवर आक्षेप घेत इस्टीमेट दाखवण्याची मागणी केली. हा सर्व प्रकार म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे अशी चर्चा नागरिकांमध्ये होऊ लागली आहे. सत्तेत सहभागी असूनही चक्क इस्टीमेट दाखवण्याची मागणी केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
बीड नगर पालिकेतील एमआयएम स्वतंत्र गट सत्तेत सहभागी आहे. महत्त्वाच्या समित्या त्यांच्याकडे असून काल सर्व पदाधिकार्यांनी माळीवेस येथील रस्ता काम रोखण्याचा प्रयत्न केला. एवढेच नव्हे तर इस्टीमेट दाखवा आणि काम करा असेही त्यांनी सांगितले. सत्ताधारी असुनही त्यांना रस्त्यावर जावून इस्टीमेट दाखवा म्हणण्याची वेळ यावी म्हणजे दुर्देवच अशी लोकांमध्ये होवू लागली आहे.सत्तेतील महत्त्वाची पदे त्यांच्याकडे आहेत. त्यांनी कॅबीनमध्ये बसून कामे करणार्या संबंधीत यंत्रणेला त्याठिकाणी इस्टीमेट घेवुन बोलावणे आणि काम दर्जेदार करण्याच्या सुचना देणे अपेक्षीत होते असेही लोकांमध्ये बोलले जावू लागले आहे.
Add new comment