लाइव न्यूज़
बीड पालिकेच्या मुख्याधिकार्यांना न्यायालयाने बजावले अटक वॉरंट लक्ष्मणनगर भागातील घरे पाडल्याचे प्रकरण
Beed Citizen | Updated: March 28, 2018 - 3:17pm
बीड,(प्रतिनिधी):- शहरातील लक्ष्मण नगर भागातील १४ घरे पाडल्याप्रकरणी त्या रहिवाश्यानीं औरंगाबाद हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या प्रकरणात नोटीस बजावूनही सुनावणीला हजर न राहिल्याने नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ.धनंजय जावळीकर यांच्याविरुद्ध न्यायालयाने जामीनपात्र अटक वॉरंट बजावले आहे.
बीड नगरपालिकेने शहरातील लक्ष्मण नगर भागात असलेली १४ घरे अतिक्रमीत असल्याचे कारण दाखवून पाडले होते. त्या रहिवाश्यांनी सदरील कारवाई जाणिवपुर्वक झाल्याचा आरोप करत गेल्या अनेक वर्षापासुन आम्ही याच ठिकाणी राहत असुन पालिकेकडे विविध करांचा भरणा करत आहोत तरी देखील आमची घरे अतिक्रमण कशी? असा सवालही त्या कुटूंबियांनी उपस्थित केला होता. पालिकेने त्यांची कसलीच दखल न घेतल्याने तेथीलच आयेशाबेगम महंमद अब्दुल्ला इनामदार यांनी औरंगाबाद हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या प्रकरणी न्यायालयाने मुख्याधिकारी धनंजय जावळीकर यांना २५ जानेवारी रोजी नोटीस बजावून २२ मार्चला न्यायालयात हजर राहण्याबाबत आदेशित केले होते. मात्र दि.२२ मार्च रोजी मुख्याधिकारी गैरहजर होते. त्याची दखल घेत औरंगाबाद हायकोर्टाने डॉ.धनंजय जावळीकर यांच्याविरुद्ध जामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे. या प्रकरणात आयेशाबेगम इनामदार यांच्यावतीने ऍड.सय्यद तौसिफ यांनी न्यायालयात बाजू मांडली.
Add new comment