व्यापार्‍यांचा मोर्चा

बीड(प्रतिनिधी) :- संपुर्ण प्लास्टिक बंदीमुळे व्यवसायिकांवर बेरोजगारीची कुर्‍हाड कोसळणार आहे. सदरील बंदीच्या विरोधात व्यापारी महासंघाने आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून बंदीच्या निर्णयामध्ये सुधारणा करण्याची आग्रही मागणी केली. यावेळी व्यापारी महासंघाच्यावतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
बीड येथील सारडा कॅपिटलसमोरुन निघालेला मोर्चा दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचला. यावेळी व्यापार्‍यांनी प्लास्टिक व डिसपोजेबल बंदीच्या निर्णयाचा जाहीर निषेध नोंदवला. बंदीमुळे बेरोजगार होणार्‍या कामगारांना न्याय द्या, प्लास्टिक आपला मित्र आहे शत्रू नाही अशा आशयाचे फलक हातात घेऊन रस्त्यावर उतरलेल्या व्यापार्‍यांनी भरउन्हात शासनाच्या निर्णयाचा निषेध नोंदवला. प्लास्टिक बंदीमुळे किराणा व्यापारी, हॉटेल व्यवसायीक, धान्य दुकानदार, स्विट होम, ङ्गुड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज, महिला गृह उद्योग, गारमेंट इंडस्ट्रीज, साडी-ड्रेस मटेरिअल आणि स्टेशनरी व कटलरी तसेच बेकरी चालक व्यापार्‍यांसमोर अनेक अडचणी निर्माण होणार आहेत. त्यामुळे शासनाने संपूर्ण प्लास्टिक बंदीच्या निर्णयामध्ये सुधारणा करावी आणि छोट्या व्यापार्‍यांना दिलासा द्यावा या मागणीचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले. दरम्यान मोर्चामध्ये सहभागी झालेल्या व्यापार्‍यांनी दुपारपर्यंत आपली सर्व प्रतिष्ठाने बंद ठेवून प्लास्टिकबंदीच्या निर्णयाचा निषेध नोंदवला.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.