लाइव न्यूज़
खुला प्रवर्ग कर्मचारी महासंघाच्या आंदोलनाने प्रशासनाचे धाबे दणाणले आंदोलनाचा दुसरा दिवस ; विविध राजकीय पक्षांचा पाठिंबा
बीड,(प्रतिनिधी):- बीड जिल्हा परिषदेमध्ये बिंदुनामावलीत अनियमितता झाल्याने खुल्या प्रवर्गातील कर्मचार्यांवर होणार्या अन्यायाच्या निषेधार्थ खुला प्रवर्ग कर्मचारी महासंघाने २६/०३/२०१८ पासून जिल्हा परिषद कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. मंगळवारी आंदोलनाचा दुसरा दिवस असून विविध सामजिक संघटना, राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकार्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा दर्शविला आहे. आंदोलनास वाढत्या पाठिंब्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाचे ढाबे दाणाणले आहेत.
बीड जिल्हा परिषदेमध्ये बिंदुनामावलीत अनियमितता झाल्याचे निदर्शनास आल्याने खुला प्रवर्ग कर्मचारी महासंघाने जिल्हा परिषदेच्या शिक्षक १०० बिंदुनामावली २०१६ मध्येे खुल्या प्रवर्गाच्या बिंदुवर एकूण ८५४ मागासवर्गीय कर्मचारी दर्शविले आहेत. त्या सर्व पदांची निवड प्रवर्गनिहाय सखोल चौकशी तात्काळ करावी व त्यानुसार बिंदूनामावली अद्यावत करावी, ज्या कर्मचार्यांचे निवड प्रवर्गाचे पुरावे सापडत नसतील त्या कर्मचार्यांना नैसर्गिक न्यायानुसार त्यांच्या त्यांच्या मुळ प्रवर्गावर नोंदविण्यात यावे (संदर्भ- वस्तीशाळा शिक्षक जीआर ०१/०३/२०१४), प्रचलित बिंदूनामावलीत तीन आरक्षित प्रवर्गामध्ये अतिरिक्त ठरलेल्या ४७८ पदांबाबत २७ नोव्हेंबर २०१५ च्या शासन निर्णयानुसार पूर्वलक्षी प्रभावाने तात्काळ अंमलबजावणी करावी, माहिती अधिकारअंतर्गत मागवलेली शेष माहिती जसे निवड याद्या, निवड सूची, वस्तीशाळा माहिती आदी तात्काळ व प्रमाणित स्वरुपात उपलब्ध करुन द्यावी, उपलब्ध माहितीनुसार बीड खुल्या प्रवर्ग महासंघाने आजतागायत प्रशासनाकडे पुराव्यानिशी दाखल केलेल्या १६९ आक्षेपांची प्रचलित बिंदूनामावली तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी या मागण्यांसाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान या आंदोलनास शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र मस्के, कॉंग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अशोक हिंगे, शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, सचिन मुळूक, मराठा क्रांतीमोर्चचे समन्वयक मंगेश पोकळे, जाधव, मळीराम यादव, संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष राहुल वायकर, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष अशोक ठाकरे, अखिल भारतीय मराठा महासंघाचे विनोद इंगोले, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश कवठेकर, माऊली जरांगे, युवक नेते युधाजित पंडित, युवक नेते जयदत्त धस, जिल्हा परिषद सदस्य अविनाश मोरे, अशोक लोढा, छावा संघटनेचे गंगाधर काळकुटे, राजमुद्राचे संस्थापक किशोर पिंगळे, डॉ.पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचे अध्यक्ष आनंद पिंगळे, महाराष्ट्र शिक्षक संघाचे अध्यक्ष श्रीराम बहिर, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे सुनील कुर्लेकर, राज्य सरचिटणीस हरिदास घोगरे, जिल्हा परिषद शिक्षक संघाचे रवींद्र खोड, कास्ट्राईबचे राज्य सहसचिव सुर्यकांत जोगदंड, बहुजन शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष विजयकुमार समुद्रे, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र आमटे, सुराज्य सेनेचे विनोद कुटे अशा विविध सामाजिक, राजकीय संघटनांनी आंदोलनस्थळी येऊन पाठिंबा दर्शविला आहे.
-----
बिंदूनामावली प्रकरणाची चौकशी करू
खुला प्रवर्ग कर्मचारी महासंघाने सुरू केलेल्या धरणे आंदोलनाची दखल जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख यांनी घेतली. यावेळी देशमुख यांनी जिल्हा परिषदेमधील बिंदूनामावलीत झालेल्या अनियमिततेची चौकशी विशेष समिती मार्फत करू असे आश्वासन दिले.
Add new comment