लाइव न्यूज़
वाळू अभावी हजारो कामगारांची उपासमार; माजलगावात भर उन्हात मोर्चा
वाळूबंदीने कोट्यावधींची उलाढाल ठप्प; तहसिल प्रशासनाला निवेदन
माजलगाव, (प्रतिनिधी):- वाळूअभावी जिल्हाभरातील बांधकामे ठप्प झाल्याने हजारो कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. बांधकामाशी संबंधित व्यवसाय करणारे कामगार, मजुर यांच्यावर बेरोजगारीची कुर्हाड कोसळूनही प्रशासन केवळ बघ्याची भुमिका घेत आहे. वाळू ठेक्याच्या लिलावाची प्रक्रिया प्रशासकीय कचाट्यात अडकली असुन यासंदर्भात कामगार रस्त्यावर उतरु लागले आहे. माजलगावमध्ये आज दुपारी भर उन्हामध्ये तहसिल कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. वाळू उपलब्ध करुन द्या, कामगार कल्याण मंडळाचे कार्यालय सुरु करावे आदि मागण्यांचे निवेदन तहसिलदारांना देण्यात आले.
माजलगाव येथे आज दुपारी मोंढा मैदानापासुन कामगारांच्या मोर्चाला सुरुवात झाली. बांधकामाशी संबंधित व्यापारी, व्यवसायिक देखील या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. मोंढा मैदानातून निघालेला मुक मोर्चा तहसिल कार्यालयात पोहोचला. यावेळी अनंत रुद्रवार, सुरेंद्र रेदासनी, पवन मुंदडा, डॉ.उद्धव नाईकनवरे, सुनिल भांडेकर, अशोक शेजुळ, भास्कर घाडगे, रमेश चांडक, सलिमभाई गुत्तेदार, अशोक शेटे, अमित अजमेरा, सचिन रेदासनी, पवन मुंदडा, विठ्ठल नाईकनवरे, निलेश काकडे, शौकत तांबोळी, बाळू शेंडगे, प्रदिप चत्रभुज आदिंच्या नेतृत्वात उपस्थित कामगार आणि मजुरांनी तहसिलदारांना निवेदन दिले. १२ महिने वाळू चालू ठेवा, माजलगाव येथे कामगार कल्याण मंडळाची स्थापना करावी आदि मागण्यांचा निवेदनामध्ये समावेश होता.
Add new comment