लाइव न्यूज़
ग्रामीण पेयजल योजनेचे अर्धवट काम तात्काळ पुर्ण करा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कचेरीसमोर अमरण उपोषण
बीड, (प्रतिनिधी):- केज तालुक्यातील मौजे लाडेगाव येथील ग्रामीण पेयजल योजनेचे काम अर्धवट झाले असून हे काम तात्काळ पुर्ण करण्यात यावे या मागणीसाठी आज जिल्हा कचेरीसमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने अमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.
मौजे लाडेगाव येथील ग्रामीण पेयजल योजनेचे निम्यापेक्षा जास्त काम ३ वर्षापासून अर्धवट अवस्थेत पडले आहे. संबंधीत गुत्तेदार हे काम पुर्ण करण्यास जाणीवपुर्वक टाळटाळ करीत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला असून या कामामध्ये अपहार, अनियमतता असण्याची दाट शक्यता असल्याचे निवेदनात म्हटले आहे. जिल्हा कचेरीसमोर सुरू करण्यात आलेल्या अमरण उपोषरामध्ये बीड जिल्हाध्यक्ष कुलदिप करपे, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद पांचाळ, राजीव गायके, चंद्रकांत अबाड, मच्छिंद्र गावडे यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.
Add new comment