अतिरिक्त शिक्षकांचे वेतन शाळेतून काढण्यास मुख्याध्यापकांचा नकार; प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या पत्राला केराची टोपली जिल्हा परिषदेसमोर शिक्षकांचे उपोषण
बीड, (प्रतिनिधी):- जिल्ह्यातील संच मान्यतेमध्ये खासगी अनुदानित प्राथमिक शाळेतून एकुण २३ शिक्षक विद्यार्थी संख्येअभावी अतिरिक्त झाले होते. या शिक्षकांचे शासनस्तरावरून दि.१३ ऑक्टोंबर २०१७ रोजी ऑनलाईन समाययोजन जिल्ह्यात विविध प्राथमिक खासगी अनुदानित प्राथमिक शाळेत झाले. २३ शिक्षकांपैकी ९ शिक्षकांना रूजू करून घेण्यात आले मात्र १३ शिक्षकांना रूजू करून घेतले नाही. ही प्रक्रिया होवून ६ महिने लोटून गेले आहेत. रूजू करून न घेतलेल्या १३ शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे. प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी या १३ शिक्षकांचे वेतन मुळ शाळेतून अदा करावेत असे लेखी आदेश दिले असतांना शाळेतील मुख्याध्यापकांनी वेतन काढण्यास नकार दिला आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या पत्राला केराची टोपली दाखवली आहे. आज अतिरिक्त शिक्षकांचे वेतन मुळ शाळेतून काढण्यात यावे या मागणीसाठी शिक्षक जिल्हा परिषदेसमोर उपोषणास बसले आहेत. यामध्ये नारायण गवते, संजय शिंदे, धनराज जाधव, विक्रम करडखेले, राजकुमार अचवले, अलकनंदा आगे, उषा रसाळ आदींचा समावेश आहे.
Add new comment