लाइव न्यूज़
पाणीपुरवठा योजनेचे ६२ लाख थकल्याने विज कनेक्शन कट विज कंपनीची कारवाईने दुष्काळात तेरावा!
Beed Citizen | Updated: March 26, 2018 - 3:17pm
बीड, (प्रतिनिधी):- नगरपालिकेच्या पाणी पुरवठा योजनेचे ६२ लाख रुपये थकल्याने विज कंपनीने योजनेचे विज कनेक्शन कट केले आहे. शहरातील अनेक भागांमध्ये दहा ते बारा दिवसांपासुन पाणीपुरवठा होत नसल्याच्या तक्रारी असतांनाच आता विज कंपनीच्या कारवाईने दुष्काळात तेरावा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
बीड नगरपालिकेच्या पाणीपुरवठा योजनेचे ८९ लाखांचे विज बिल अनेक महिन्यांपासुन थकीत आहे. काही दिवसापुर्वी पालिकेने २७ लाख रुपयांचा भरणा केला होता. मात्र अजुनही ६२ लाख रुपयांची थकबाकी होती. पालिकेला वारंवार सूचना देवूनही थकबाकी भरण्यासंदर्भात कोणतीच कार्यवाही न झाल्याने चार दिवसापुर्वी विज कंपनीने पाणी पुरवठा योजनेचे विद्युत कनेक्शन तोडले आहे. विज कंपनीच्या कारवाईने पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. दरम्यान शहरातील अनेक भागात दहा ते बारा दिवसांपासुन पाणी पुरवठा होत नसल्याच्या तक्रारी होत असतांनाच आता विज कंपनीने पाणी योजनेचे विज कनेक्शन तोडल्याने आणखी तक्रारी वाढण्याची शक्यता आहे.
Add new comment