लाइव न्यूज़
मादळमोहीत पिण्याच्या पाण्यासाठी पत्रकार संघाचा रस्ता रोको
मादळमोही, (प्रतिनिधी):-गेवराई तालुक्यातील मादळमोही येथे विविध मागण्यासाठी गेवराई तालुका ग्रामिण पत्रकार संघाच्या वतिने मादळमोही राष्ट्रीय महामार्ग क्र.२२२ वर दि.२७ मार्च रोजी रस्ता रोको अंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी बीड जिल्ह्यातील संपादक,मिडीया प्रतिनिधी, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
गेवराई तालुक्यातील मादळमोही येथील पाणी पुरवठा योजना पुर्ण होऊन देखील ग्रामस्थांना शुद्ध पाणी पुरवठा होत नाही. या बाबत अनेक वेळा बातम्या प्रकाशित करुन देखील पाणी पुरवठा होत नाही. शेवटी शुद्ध पाणी पुरवठा तात्काळ सुरु करावा.गावातील जुनाट तारा तात्काळ बदला,राशन कार्ड धारकांना तात्काळ डिजीटल कार्ड देण्यात यावे,घरकुलाचे सर्व अर्ज तात्काळ आँनलाईन करण्यात यावे,बस स्थानकावर निवारा उभारण्यात यावा, राशन दुकानावर राशन खरेदीची पक्की पावती देण्यात यावी,तसेच विविध मागण्यासाठी गेवराई तालुका ग्रामिण पत्रकार संघाच्या वतिने दि.२७ मार्च रोजी राष्ट्रीय महामार्ग क्र.२२२ वर रस्ता रोको अंदोलन करण्यात येणार आहे.
या वेळी प्रमुख उपस्थिती संपादक गंमत भंडारी, गोविंद शेळके,सुभाष चौरे,उत्तम हजारे, वैभव स्वामी,पुजाताई मोरे,मधुकर तौर, अंगत मोहिते, सुभाष शिंदे,सुरेश जाधव,उध्दव मोरे,अशोक काळकुटे,चंद्रकांत हक्कदार,शेख मुबारक,संतोष भारती,राहुल लोंढे,राहुल हाकाळे,कैलास काकडे,दयानंद धुंरधंरे,तुकाराम धस, संतराम जोगदंड,चंद्रकांत इंगोले,किरण आहेर,किरण ननवरे,रामक्रष्ण तळेकर, मधुकर सरपते,धंनजय बजगुडे,ओकांर रासकर, श्रीराम बारहाते,अमर नागरे,अविनाश तांदळे,अशिङ्ग शेख,राजेश भारती,विनोद पौळ,वाल्मिक कदम यांची उपस्तिती राहणार आहे, तरी या रस्ता रोको अंदोलनात ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहवे असे आहवान गेवराई तालुका पत्रकार संघाच्या वतिने करण्यात येत आहे.
Add new comment