तालेबभाईच्या इमानदारीला आमचाही सलाम !

बीड (प्रतिनिधी): स्वार्थाच्या या जगामध्ये ‘मी आणि माझं’ असंच काहीसं सुत्र बनलं आहे. आपलं तर आपलंच परंतू दुसर्‍याचं कसं ओरबाडून घेता येईल याचे किस्से अनेक ? परंतू रस्त्यावर सापडलेली अज्ञात व्यक्तीची बॅग त्यातील पैसे कागदपत्रे हे आपले नाहीत याची जाणीव मनात ठेवून ती अमानत त्याची त्याला परत करून तालेबभाईंनी इमानदारी दाखविली. हरवलेली मुळ कागदपत्रे आणि पैसे परत मिळाल्यामुळे प्रिया चौधरी हिचाही आनंद गगनात मावला नाही. लोभाच्या या जगामध्ये तालेबभाई सारखी माणसे आजही आहेत ही सर्वांसाठीच प्रेरणादायी बाब आहे त्यामुळे त्यांच्या या इमानदारीला आमचाही सलाम !
तीन दिवसांपूर्वीच शहरातील प्रिया विलास चौधरी ही विद्यार्थिनी कारंजा परिसरातून जात असताना तिची पर्स याठिकाणी गहाळ झाली. घरी गेल्यानंतर बरीच शोधाशोध केली परंतू त्याचा थांगपत्ता काही लागला नाही. आलेल्या रस्त्यावरून परत जावून पाहणी केली परंतू ठावठिकाणा काही लागला नाही. सदरील पर्समध्ये प्रिया चौधरी हिचे दहावी, बारावी तसेच अभियांत्रिकी पदवीचे मुळ कागदपत्रे आणि काही रक्कम होती. त्यामुळे घरच्यांना सुध्दा वाटले आपले पैसे आणि कागदपत्रे गेली. बरीच शोधाशोध केली परंतू काही ठावठिकाना लागला नाही. परंतू आजही स्वार्थाच्या या दुनियेमध्ये इमानदारी जीवंत आहे. याचाही प्रत्यय अनेक वेळा येतो. बीड शहरातील कारंजा परिसरामध्ये ‘अल सङ्गाह हज टुर्स’चे  सय्यद मोहमद तालेब अली मोहमद अमजद अली हे कारंजा परिसरातून जात असताना त्यांना ही हरवलेली पर्स मिळाली. त्यांनी सर्व पर्स तपासली असता त्यामध्ये काही रोख रक्कम आणि महत्त्वाची कागदपत्रे असल्याचे दिसून आले. तसेच बॅगमध्ये प्रिया चौधरीचा ङ्गोन नंबर असल्याचे निदर्शनास आले त्यांनी त्या नंबरवरून संपर्क साधला आणि सदरील बॅग प्रिया चौधरी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात दिली. हरवलेली पर्स, पैसे आणि कागदपत्रे सापडल्यानंतर प्रियाचा आनंद गगनात मावला नाही. वास्तविक पाहता पैसे काढून घेऊन बॅग कोठेही टाकून देता आली असती परंतू तालेबभाईच्या रुपाने या दुनियेमध्ये आजही इमानदारी जीवंत आहे अशा मुठभर लोकांमुळेच आजही लोकांचा विश्‍वास चांगुलपणावर टिकून आहे. तालेबभाईच्या या इमानदारीला आमचाही सलाम !

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.