नगरसेविका आर्शिया चाऊस यांना सुप्रिम कोर्टाचा दिलासा डीएनए टेस्ट व दंडाचा निर्णय रद्द

बीड, (प्रतिनिधी):- बीड नगरपरिषद मधील बालेपीर येथील आघाडीच्या नगरसेविका आर्शीया बेगम सईद चाऊस हिचे जिल्हाधिकारी बीड यांनी तिला ३ अपत्य असल्याबाबत अपात्र ठरविले. त्या नाराजीने आर्शीया बेगम यांनी नगरविकास खाते मंत्रालय मुंबईकडे ऍड.सय्यद अजहर अली बीड मार्फत अपील दाखल केले व त्या आदेशाला स्थगिती मिळवली होती. त्यानंतर राज्यमंत्र्याने ती स्थगिती उठविली होती. त्या नाराजीने आर्शीया बेगमने उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे ऍड.सय्यद तौसिफ यासीन मार्फत रीट याचिका दाखल केली होती. त्यात मा.उच्च न्यायालयाने ३ अपत्य असल्याबाबत नगरसेविकेची डीएनए टेस्ट करावी व दोषी आढळल्यास ५,००,०००/- रु दंड आकारण्यात यावा असा आदेश दिला होता. त्या नाराजीने आर्शीया बेगम यांनी मा.सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली येथे ऍड.सुधांशु चौधरी यांचे मार्फत एस.एल.पी.(सी.) क्र.५४६४/१८ दाखल केले होते. त्यात दि.२०/३/२०१८ रोजी सविस्तर सुनावणी होऊन मा.सुप्रीम कोर्टाने उच्च न्यायालय औरंगाबादचा रीट पिटीशन क्र.४४१/१८ आदेश रद्द केला व राज्यमंत्र्याने सहा आठवड्यात पुन्हा सुनावणी घेऊन नव्याने निकाल द्यावा असा आदेश केला. तोपर्यंत नगरपरिषद नविन पोट निवडणूक घेऊ नये असा निकाल दिला. या निकालामुळे नगरसेविका आर्शीया बेगम सईद चाऊस यांना दिलासा मिळाला आहे. या निकालामुळे आघाडीचे उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर, फारुख पटेल, अमर नाईकवाडे यांनी वकिलांचे आभार व्यक्त केले.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.