राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाच्या प्रदेश सरचिटणीसपदी अॅड सय्यद खाजा

प्रदेशाध्यक्ष बाळबुधे यांनी आ. जयदत्त क्षिरसागर यांच्या उपस्थितीत दिले नियुक्तीपत्र 

 
बीड ( प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना अभिप्रेत संघटना बांधणीसाठी पक्ष पातळीवरून सामान्य कार्यकर्त्यांना संधी दिली जात आहे. आ. जयदत्त क्षीरसागर यांचे खंदे समर्थक ऍड . सय्यद खाजा यांची राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाच्या प्रदेश सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे. ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे यांनी त्यांना नियुक्ती पत्र दिले असून राज्य कार्यकरिणीवर    झालेल्या निवडीमुळे त्यांचे अभिनंदन होत आहे.
 

बीड जिल्ह्यातील जेष्ठ नेते आ. जयदत्त क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली पक्ष बांधणीसाठी  ऍड. सय्यद खाजा गेल्या अनेक वर्षांपासून कार्य करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम करतांना त्यांनी जिल्हयात मोठ्या प्रमाणात संघटन बांधणी करून पक्षाच्या पाठीशी ताकद उभी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओबीसी समाजातील प्रश्नांना वाचा फोडून अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केलेला आहे. विदयार्थी शिष्यवृत्तीसह मराठी भाषा फौंडेशन वर्ग योजनेतील मानसेवी शिक्षक प्रश्नी त्यांनी राज्यभर लढा उभारलेला आहे. त्यांच्या कार्याची आणि पक्ष वाढीसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची दखल घेत पक्षाने ऍड. सय्यद खाजा यांच्यावर राज्य कार्यकारिणीतील महत्वाची जबाबदारी सोपवली आहे. ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे यांनी ऍड. सय्यद खाजा यांची राष्ट्रवादी काँग्रेस  ओबीसी विभागाच्या प्रदेश सरचिटणीसपदी निवड केली आहे. त्याचे नियुक्ती पत्र बाळबुधे यांनी खाजा यांना दिले असून यावेळी जेष्ठ नेते आ. जयदत्त क्षीरसागर , ऍड. शेख शफीक भाऊ , शाहेद पटेल आदींची उपस्थिती होती. ऍड. सय्यद खाजा यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.