लाइव न्यूज़
भगीरथ बियाणी यांच्या वाढदिवसानिमित्त 600 रुग्णांची मोफत तपासणी
अशफाक शेख मित्र मंडळाचा उपक्रम ; 15 रुग्णांची नेत्र शस्त्रक्रिया होणार
बीड ( प्रतिनिधी ) भाजप युवा मोर्चाचे नेते भगीरथ बियाणी यांच्या वाढदिवसानिमित्त मोमीनपुरा येथे 600 रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यामध्ये दंत तपासणीत 273 तर नेत्र तपासणीत 318 जणांचा समावेश होता. त्यातील 15 रुग्णांवर नेत्र शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. येथील युवा नेते अश्फाक शेख यांनी मित्र मंडळाच्या वतीने हा उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपली.
बीड येथील भाजयुमोचे नेते भगीरथ बियाणी यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. मोमीनपुरा येथील आरोग्य केंद्रात युवा नेते अश्फाक शेख यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. दंत रोग शिबिरात 273 जणांची तपासणी करून त्यांना मोफत औषधी देण्यात आली तर 318 नागरिकांची नेत्र तपासणी करून त्यांच्यावरही औषधोपचार करण्यात आले. त्यातील 15 रुग्णांना मोतीबिंदू असल्याचे निदान झाले असून त्या रुग्णांवर लवकरच मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे मित्र मंडळाचे अध्यक्ष अश्फाक शेख यांनी सांगितले. तपासणीसाठी डॉ. नागार्जुन , डॉ. जिया सौदागर , पालवे , डॉ. सायली , भानू प्रिया , तक्षशिला , अपूर्वा , प्रियांका , समिधा , शुभम , क्रांती , मेघना , कल्पना , कृष्णा आदी डॉक्टरांनी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला. याावेळी
अशफाक भाई शेख ,वाजेद शेख
अख्तर शेख ,कलीम शेख ,सरफराज शेख, सय्यद अमजद ,ईमरान खॉन हैदर , शेख मोहम्मद आवेस ,नविद इनामदार, आवेस ईनामदार ,आमेर इनामदार, अजहर काका ,ईमरान (चुन्नू), ईमरान पेंटर ,फेरोज ईनामदार ,वसीम ईनामदार ,सय्यद ईद्रिस ,सय्यद जफर ,शहेबाज खान यांच्यासह सरकार व एसआरके ग्रुप यांची उपस्थिती होती.
Add new comment