लिकेज दुरूस्तीच्या नावाखाली नगर पालिका घोडके, देशमुखांनी पोखरली

दर महिन्याला दुरूस्तीसाठी लाखोचा निधी तरीही कंत्राटी कामगारांचा आठ महिन्याचा पगार नाही
बीड, (प्रतिनिधी):- नगर पालिकेच्यावतीने शहरातील पाणी पुरवठा विभागाकडून पाणी लिकेज, वॉल दुरूस्तीसाठी प्रत्येक महिन्याला लाखो रूपयाचा निधी गुत्तेदाराच्या घशात घातला जात आहे. तरीही शहरातील वॉल दुरूस्ती व लिकेजची समस्या कायम असून नगर पालिकेच्या कर्मचार्‍याच्या आशिर्वादाने खासगी गुत्तेदार पोसण्याचे काम होत असल्याचा आरोप एमआयएमचे नगरसेविका शेख बिस्मिला पाशामियॉं यांनी केला आहे.
बीड नगर पालिकेच्या पाणीपुरवठा विभागात कायम अनागोंदी कारभार चालत असून शहरात मोठ्या प्रमाणावर रस्ता दुरूस्ती व नविन रस्त्यांचे काम सुरू आहे. यामध्ये शहरातून गेलेल्या पाईपलाईन लिकेज झाल्या असून बर्‍याच ठिकाणी वॉल लिकेजही आहेत. यासाठी नगर पालिकेने खाजगी गुत्तेदार शेख अङ्गसर, हामेद चाऊस यांची नेमणूक केली असून त्यांच्या मार्ङ्गत शहरात वॉल लिकेज व पाईपलाईन दुरूस्तीसाठी १०० कंत्राटी कामगारांची नियुक्ती केलेली आहे. मात्र शहरात थातुर-मातुर  लिकेज दुरूस्ती करण्याचे काम होत आहे. मस्टरवर १०० कामगार दाखवत प्रत्यक्ष मात्र २० कामगारच कामावर असल्याचा गंभीर आरोप एमआयएमच्या नगरसेविका शेख बिस्लिमा पाशामियॉं यांनी केला आहे. न.प.च्यावतीने प्रत्येक महिन्यात लिकेज दुरुस्तीच्या नावाखाली लाखोचा निधी दिला जातो. प्रत्यक्ष मात्र कंत्राटी कामगारांच्या ८ महिन्याच्या पगारीही होत नाही. नगर पालिकेचे घोडके, देशमुखांनी नगर पालिकेचा पाणीपुरवठा विभाग गुत्तेदारांच्या घशात घालण्याचा प्रयत्न चालविला आहे. या गंभीरबाबीकडे मुख्याधिकारी यांनी लक्ष देत पाणीपुरवठा विभागात चालत असलेल्या अनागोंदी कारभाराची चौकशी करण्याची मागणी नगरसेविका शेख बिस्लिमा यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.