लाइव न्यूज़
मुस्लिम समाजातील मुलींच्या वसतीगृहाचा प्रश्न मार्गी लागणार आ जयदत्त क्षीरसागर व शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची आज बैठक
Beed Citizen | Updated: March 23, 2018 - 3:08pm
बीड, (प्रतिनिधी):- बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील शाळा खोल्यांच्या बांधकामा साठी आ.जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रश्नांची दखल घेऊन यासाठी निधी उपलब्ध केला जाणार असल्याचे मुख्यमंत्री ङ्गडणवीस यांनी जाहीर केल्या नंतर बीडमध्ये मुस्लिम समाजातील मुलींसाठी स्वतंत्र व सुसज्ज वसतिगृह व्हावे यासाठी केलेल्या प्रयत्नाला यश मिळाले आहे, छत्रपती शिवाजी महाराज चौकातील कन्या शाळेच्या बाजूला हे वसतिगृह होणार असून आज दुपारी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याबरोबर बैठक होणार असून या बैठकीत निर्णय जाहीर होणार आहे.
बीडमध्ये मुस्लिम समाजाच्या मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह व्हावे यासाठी आ. क्षीरसागर यांनी पालकमंत्री असतानाच आघाडी सरकारच्या काळात वस्तीग्रहाला मंजुरी दिली होती. यासाठी जागा मिळाली नाही,याबाबत सातत्याने पाठपुरावा चालू होता,काही महिन्यांपूर्वी खंडेस्वरी भागांत या वस्तीग्रहाला जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला होता मात्र ही जागा मुलींच्या दृष्टीने योग्य नसल्यामुळे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी चोकातील कन्या शाळेच्या मागील बाजूची जागा उपलब्ध झाली आहे,आ.क्षीरसागर यांनी याबाबत पाठपुरावा करून जागेबाबतचा प्रस्ताव मंजूर करून घेतला आहे आज शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी बैठक होणार असून यावेळी वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लागणार आहे,मुस्लिम समाजातील मुलीच्या दृष्टीने सुसज्ज असे हे वसतिगृह होणार असून मुलींच्या सोयीचे असणार आहे,आ क्षीरसागर यांनी केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाल्याने मुस्लिम समाजातील जनतेत समाधान व्यक्त केले जात आहे.
Add new comment