मिलिंद एकबोटेला कोर्टात काळं फासण्याचा प्रयत्न, पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ

पुणे-  (प्रतिनिधी):-काेरेगाव-भीमा दंगलप्रकरणी अटक करण्यात अालेला समस्त हिंदू अाघाडीचा कार्याध्यक्ष मिलिंद एकबाेटे याला पुन्हा एकदा दोन दिवसाची पोलिस कोठडी वाढविण्यात आली आहे. दरम्यान, पुणे सत्र न्यायालयाच्या आवारात एकबोटेवर काळं फासण्याचा प्रयत्न झाला. मात्र, तो अयशस्वी झाला. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.

 

मिलिंद एकबोटेला बुधवारी अटक करण्यात आली होती तर, गुरुवारी न्यायालयात हजर केले. या वेळी अतिरिक्त सत्र न्यायाधीश प्रल्हाद भगुरे यांनी दाेन्ही बाजुंच्या वकिलांचा युक्तिवाद एेकून घेऊन एकबाेटेला १९ मार्चपर्यंत पाेलिस काेठडी सुनावली. पोलिस कोठडी संपल्याने आज पुन्हा एकबोटेला न्यायालयात हजर करण्यात आले असता आणखी दोन दिवसाची पोलिस कोठडी वाढविण्यात आली.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.