लाइव न्यूज़
शिवसेना आपल्या दारी अभियानांतर्गत ८० पेक्षा जास्त गावात पोहोचले शिवसैनिक
खांडेंच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी हिवरापहाडी, मोची पिंपळगाव, कारेगव्हाणात घेतल्या शेतकऱ्यांच्या भेटी
बीड (प्रतिनिधि) :- शिवसेना आपल्या दारी अभियानांतर्गत बीड विधानसभा क्षेत्रातील ८० पेक्षा जास्त गावातील शेतकऱ्यांना शिवसैनिकांनी भेट देत शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या आदेशावरून, शिवसेना नेते रामदासभाई कदम व संपर्कप्रमुख सुधीर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या नेतृत्वात हे अभियान चालू आहे. अभियानास शेतकर्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. दि १९ मार्च रोजी पाली सर्कलमधील हिवरापहाडी, मोची पिंपळगाव, कारेगव्हाण येथे शिवसैनिकांनी शेतकऱ्यांच्या भेटी घेत कर्जमाफी, हमीभाव इत्यादींची माहीती घेतली. यावेळी जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्यासह तालुकाप्रमुख उल्हास गिराम, जिल्हासंघटक बाप्पासाहेब घुगे, सुधीर कुलकर्णी, आबा घोडके, नाथा शेळके, बाळू तांदळे यांच्यासह शेतकरी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Add new comment