लाइव न्यूज़
स्वराज्यात स्वाभिमानाने जगायला छत्रपती शिवरायांनी शिकवलं-इंदोरीकर
बीड, (प्रतिनिधी):- महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आयोजित शिवजन्मोत्सव व माजी खा.निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमत्त ह.भ.प.समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. बीड शहरातील नागरिकांनी अभुतपुर्व गर्दी केली केली. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन करण्यात आली. ह.भ.प.इंदोरीकर महाराजांनी सध्याच्या काळात आई-वडिलांना काही लोक लक्ष देत नसुन त्यांना वृद्धाश्रमात राहण्याची वेळ आली आहे. सध्या जो आई वडिलांना संभाळतो आणि त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देतो त्यांची सेवा करतो आणि स्वाभिमानाने जगतो तोच खरा शिवभक्त असुन शिवरायांना फक्त जयंतीपुरते मर्यादित न ठेवता त्यांचे आचार-विचार मनात रुजावावे असे मत ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी व्यक्त केले.
शुक्रवार दि.१६ मार्च २०१८ रोजी बीड येथील महात्मा फुले पुतळ्याजवळ डी.पी.रोड येथे महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आयोजित शिवजन्मोत्सव सोहळा व निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदुरीकर बोलत होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून दैनिक पार्श्वभुमीचे संपादक गंमत भंडारी, बीड शहराचे नगराध्यक्ष भारतभुषण क्षीरसागर, किशोर उबाळे, आरपीआयचे राजु जोगदंड, शिवसेनेचे जयसिंग चुंगडे,युवा नेते ऍड.शेख शफिक, नगरसेवक शुभम धुत, संतोष जाधव, विनेश उबाळे, राहुल वायकर, धनंजय वाघमारे, शाहेद पटेल, मागदे सर, मुकूंद भोसले, दत्ता शिंदे, विनोद चव्हाण आदि उपस्थित होते
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक प्रा.सचिन उबाळे यांनी केले. यावेळी ह.भ.प.इंदुरीकर महाराज यांचे किर्तन झाले. यावेळी किर्तनातून त्यांनी शिवरायांच्या काळामध्ये त्यांनी कोणत्याही जातीधर्माला विरोध न करता सर्व जाती धर्मातील नागरिकांना एकत्र करुन एकच जात ती म्हणजे मावळा असे मत व्यक्त करुन स्वाभिमानाने जगायला शिकवले. यावेळी बीड शहरातील अनेक शिवभक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासां आयोजक महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे जिल्हाप्रमुख प्रा.सचिन उबाळष, बाळासाहेब कदम, विनोद काळे, कान्हा साबळे, अतुल जव्हेरी, मुकेश भस्मारे, शिवजन्मोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत उबाळे, अध्यक्ष निसार तांबोळी, राहित गायकवाडसह परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन ज्ञानदेव काशिद यांनी केले तर आभार निसार तांबोळी यांनी केले.
Add new comment