लाइव न्यूज़
वाहेगावमध्ये हिंस्त्र प्राण्याचा जनावरांवर हल्ला; बिबट्याचा संशय वासराचा ङ्गडशापाडून बैलाची शिंगे तोडली; शेतकर्यांमध्ये भितीचे वातावरण
गेवराई, (प्रतिनिधी):- अज्ञात हिंस्त्र प्राण्याने आज सकाळच्या सुमारास शेतात बांधलेल्या जनावरांवर हल्ला चढविला. त्यामध्ये एका वासराचा ङ्गडशा पाडला असून एका बैलाचे शिंग तोडल्याचा प्रकार आहेर वाहेगाव (ता.गेवराई) येथे घडला आहे. घटनेची माहिती कळताच पशुवैद्यकिय अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून दुपारी उशिरापर्यंत पंचनामा सुरू होता. दरम्यान जनावरांवरील जखमा आणि त्याची तिव्रता पाहता वाघ किंवा बिबट्याचे हे कृत्य असल्याचा संशय व्यक्त केला जात असून प्रशासनाने यासंदर्भात तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
गेवराई तालुक्यातील आहेर वाहेगाव येथील सय्यद अहेमद आणि सय्यद हारूण यांच्या शेतामध्ये जनावरे बांधलेली होती. सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास सय्यद अहेमद यांचा मुलगा तेथून घराकडे आल्यानंतर काही वेळातच तेथील जनावरांवर अज्ञात प्राण्याने हल्ला केल्याची माहिती त्यांना कळाली. ग्रामस्थांनी त्यांच्या शेतात धाव घेवून पाहिले असता एक वासरू मृत अवस्थेत आढळून आले. त्या वासराचा कोथळाच बाहेर पडला होता. जवळच बांधलेल्या एका बैलाचे शिंग तुटलेले तर दुसर्या बैलाच्या अंगावरही जखमा आढळून आल्या. या घटनेची माहिती गेवराईच्या पशुवैद्यकिय अधिकार्यांना देण्यात आली. त्यांनी घटनास्थळी येवून नोंद घेतली असून दुपारी उशिरापर्यंत पंचनामा सुरू होता.
शेतकर्यांमध्ये भिती; प्रशासनाने दखल घेण्याची मागणी
आहेर वाहेगावमध्ये आज सकाळी अज्ञात हिंस्त्र प्राण्याने जनावरांवर हल्ला केला. त्यामध्ये एका वासराचा मृत्यू झाला असून घटनेवरून या भागात वाघ किंवा बिबट्याचा वावर असण्याचा संशय व्यक्त केला जात असून सदरील घटनेमुळे परिसरातील शेतकर्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. जनावरे शेतात बांधावीत की नाही? असाही प्रश्न उपस्थितीत होत असून प्रशासनाने त्याची दखल घ्यावी अशी मागणी केली जात जात आहे.
Add new comment