लाइव न्यूज़
बीडचा भुमिपुत्र साकारतोय ‘जगावेगळी अंतयात्रा’ एक आनंदी प्रवास! डॉ.विशाल गोरे यांचा चित्रपट २३ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला
बीड, (प्रतिनिधी):- समाजातील वास्तव परिस्थिती आणि बेरोजगारीवर आधारीत ‘जगावेगळी अंतयात्रा’ एक आनंदी प्रवास हा मराठी चित्रपट २३ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. भाऊ कदम यांच्यासह अन्य प्रसिद्ध कलाकारांचा समावेश असलेला चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल असा विश्वास चित्रपटातील अभिनेते तथा बीडचे भुमिपुत्र डॉ.विशाल गोरे यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. दरम्यान बीडचा भुमिपुत्र असलेले डॉ.विशाल गोरे हे ‘जगावेगळी अंतयात्रा’ एक आनंदी प्रवास या चित्रपटात भुमिका साकारत आहेत ही मोठी गोष्ट आहे.
बीड येथे आज झालेल्या पत्रकार परिषदेत चित्रपट अभिनेते डॉ.विशाल गोरे यांच्यासह त्यांचे मेहुणे येथील सी.ए.बी.बी.जाधव यांची उपस्थिती होती. यावेळी डॉ.विशाल गोरे म्हणाले, वैद्यकीय अभ्यासक्रम पुर्ण करुन सोलापुरमध्ये प्रॅक्टीस सुरु आहे. वैद्यकीय क्षेत्रात असलो तरी अभिनयाची असलेली आवड आणि मिळालेली संधी पाहून ‘जगावेगळी अंतयात्रा’ एक आनंदी प्रवास या चित्रपटात अभिनय करण्याचा निर्णय घेतला. सामाजिक दायित्वाची जबाबदारी म्हणून बेरोजगारीवर आधारीत समाजाला दिशा दाखविण्याचा प्रयत्न करणार्या मराठी चित्रपटात अभिनय करण्याची संधी ही बाब माझ्या दृष्टीने मोठी असल्याचे त्यांनी सांगितले. जगावेगळी अंतयात्रा एक आनंदी प्रवास या चित्रपटात भाऊ कदम यांच्यासह अन्य नामांकित कलाकार अभिनय करत आहे. दि.२३ मार्च रोजी हा मराठी चित्रपट राज्यभरात प्रदर्शित होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
भाऊजींचे मार्गदर्शन मोलाचे
‘जगावेगळी अंतयात्रा’ एक आनंदी प्रवास या मराठी चित्रपटात एल.एल.बीचा विद्यार्थी म्हणून भुमिका साकारणारे डॉ.विशाल गोरे बीडचे भुमिपुत्र आहेत. येथील प्रसिद्ध सीए बी.बी.जाधव यांचे ते मेहूणे आहेत. पत्रकार परिषदेत सुरुवातीलाच डॉ.विशाल गोरे यांनी भाऊजींचे म्हणजेच बी.बी.जाधव यांचे मार्गदर्शन नेहमीच मिळत असल्याचे सांगितले. महाविद्यालयीन जिवनापासुन प्रत्येक महत्वाच्या निर्णयाच्यावेळी त्यांचे मिळणारे मार्गदर्शन दिशा देणारे ठरले असुन या चित्रपटात अभिनय करण्यापुर्वीही त्यांचेच मार्गदर्शन घेतल्याचे त्यांनी सांगितले.
Add new comment