लाइव न्यूज़
बीडमध्ये लाखोंचा गांजा पकडला झमझम कॉलनीत पहाटे कारवाई होवूनही दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल नाही
Beed Citizen | Updated: March 16, 2018 - 3:39pm
बीड, (प्रतिनिधी):- शहरातील झमझम कॉलनी येथील एका गोडाऊनमध्ये पोलिसांनी छापा टाकला. पहाटे केलेल्या कारवाईत लाखोंचा गांजा जप्त करण्यात आला असून याप्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता. कारवाई झाली, मोठा मुद्देमालही जप्त केल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले असले तरी त्याचा अधिक तपशील देण्यास त्यांनी नकार दिला. दरम्यान पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास कारवाई होवूनही दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल का नाही? असा प्रश्न सर्वसामान्यातून उपस्थित केला जात आहे.
बीड शहर पोलिस ठाणे हद्दीतील झमझम कॉलनी भागात पोलिसांनी आज पहाटे कारवाइ केली. एका गोडाऊनमध्ये गांजा साठवून ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी २० किलो गांजा जप्त केला. गोडाऊनमध्ये छापा टाकूनही पोलिसांना आरोपी सापडला नसल्याने दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता. कारवाई झाली, लाखोंचा मुद्देमालही पकडण्यात आला असून सदरील मुद्देमाल कितीचा, तो कोणाचा याचा तपशिल देण्यास पोलिसांनी मात्र नकार दिला. दरम्यान पहाटेच्या वेळी कार्यवाही होवूनही दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल न झाल्याने आश्चर्य व्यक्त होत असून मोठ्या अधिकार्यांनी कारवाई करूनही विलंब का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
Add new comment