आरक्षणाचा वनवास न संपवल्यास तुम्हाला वनवासात पाठवू- भारत सोन्नर

बीड,(प्रतिनिधी):- यशवंत सेना धनगर समाजाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप सरकार यांच्या निषेधार्थ संतप्त धनगर समाज बांधव रस्त्यावर उतरून या सरकारचा निषेध करत जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे यशवंत सेना धनगर समाज नेते भारत सोन्नर यांच्या नेतृतवाखाली आंदोलन करण्यात आले या प्रसंगी समाजबाधवांना  मार्गदर्शन करताना भारत सोन्नर म्हणाले की धनगर आरक्षण प्रश्न या सरकाने अद्यापि सोडविलेला नाही आमची सत्ता आलू की पहिल्या मंत्रिमंडळ बैठकात आरक्षण प्रश्न सोडविला जाईल  असे आश्वासन अभ्यास पुरुष देवेंद्र फडणवीस म्हणाले होते परंतु ‘धनगड’ ‘धनगर’ या चुकीच्या झालेल्या उच्चारामुळे ही चूक दुरुस्त करण्यासाठी टीस या संस्थेला अभ्यास करण्यासाठी दिले आहे आज चार वर्षे झाली आहे या सरकारला तरी देखील अहवाल शासनाकडे दिलेला नाही केवळ वेळ काढो धोरण या सरकारने अवलंबले आहे आमचा आरक्षण आम्ही घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नाहीत आम्हाला घटनेने दिलेले आरक्षण हे आम्ही मिळवणारच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव सोलापूर विद्यापीठाला देण्यात येईल असे नागपूरच्या मेळाव्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले होते परंतु पुन्हा एकदा विद्यापीठाचे नामकरण करण्यासाठी मंत्र्यांची अभ्यास करण्यासाठी समिती गठीत केली आहे हे अहिल्यांचे अवमान केला आहे अश्या या डोक फिरलेल्या भाजप सरकारचा तीव्र शब्दात निषेध करीत आहोत केवळ कर्नाटकातील येणार्‍या निवडणुकीच्या मतांसाठी अशी समिती गठीत करून चालढकल करीत आहे धनगर आरक्षण प्रश्न व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे सोलापूर विद्यापीठ नामांतर या दोन्ही प्रश्न तात्काळ सोडविण्यात यावे नाहीतर येणार्‍या काळात यशवंत सेना धनगर समाजाच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल आमचा गेल्या ६९ वर्षाचा वनवास संपवा नाहीतर तुम्हाला २०१९ च्या निवडणुकीत वनवासाला पाठविल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असा इशारा धनगर समाजाचे भारत सोन्नर यांनी या प्रसंगी दिला आहे याप्रसंगी रणजित खांडेकर अशोक भावले उमेश निर्मळ अर्जुन कोळेकर हरिभाऊ निर्मळ आकाश कोकरे बाळासाहेब घाडगे सुनील फाटक लक्ष्मण लकडे हजारो समाज बांधव उपस्तिथीत होते

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.