फसवी कर्जमाफी करणार्‍या भाजप सरकारचा घडा भरला

बीड । प्रतिनिधी

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून निर्धार शिवशाहीचा अभियाना अंतर्गत १ मार्च ते १५ मार्च पर्यंत बीड जिल्ह्य़ात भाजपने केलेल्या फसव्या कर्जमाफीचे प्रत्यक्ष गावात जाऊन शेतकऱ्यांकडून फॉर्म भरून माहिती घेण्यात येत होती.

गुरुवारी बीड जिल्हा संपर्क प्रमुख सुधीर मोरे यांनी केज तालुक्यातील पिंपळगाव व ढाकेफळ येथे शेतकऱ्यांशी बैठकीमध्ये चर्चा केली. यावेळी शेतकऱ्यांनी भाजपने फसवी कर्जमाफी केल्याचा आरोप केला. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव नाही, महागाईने कळस गाठला आहे, अशा भावनात्मक प्रतिक्रीया शेतकऱ्यांनी मोरे यांच्या समोर मांडल्या.

यावेळी बीड जिल्हा प्रमुख सचिन मुळूक, सहसंपर्क प्रमुख माजी आमदार प्राध्यापक सुनिल धांडे, चंद्रकांत नवले, उपजिल्हा प्रमुख बाळासाहेब अंबुरे, संजय महाव्दार, नवनाथ काशिद, नितीन धांडे हे उपस्थित होते. या अभियानामध्ये जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांच्या नेतृत्वाखाली केज तालुका प्रमुख रत्नाकर शिंदे व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गावागावात जाऊन शेतकऱ्यांच्या प्रतिक्रीया फॉर्मव्दारे भरून घेतल्या होत्या.

या अभियानात उपजिल्हा प्रमुख बाळासाहेब अंबुरे, केज तालुका प्रमुख रत्नाकर शिंदे , दिपक मोराळे, शहर प्रमुख बाळु पवार, युवासेनेचे अरविंद थोरात, उपतालुका प्रमुख अनिल बडे, रामहरी कोल्हे, बापु गोरे, आश्रब शेख, अशोक जाधव, विनोद गिते अभिजीत घाटुळ, कचरू थोरात, राहुल घोळवे, संभाजी देशमुख, चंद्रकांत चटप, नागनाथ थोरात, शिवाजी थोरात, अविनाश थोरात इ शिवसैनिक उपस्थित होते.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.