ऊसतोड मजुराच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार

जामखेड, (प्रतिनिधी):-तालुक्यातील राजुरी येथील उसतोड कामगाराच्या एका १२ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर गावातीलच १७ वर्षीय आरोपीने  तीच्या घरी कोणी नसताना दमबाजी करुन वेळोवेळी बलात्कार केला. या घटनेत पिडीत मुलीला दिवस गेले असुन ती चार महीन्यांची गरोदर आहे. या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
पिडीत मुलीचे आई वडील ऊसतोड कामगार आसल्याने ते अनेक वर्षांपासून ऊसतोडणी चे काम करुन आपली उपजीविका भागवतात. दर वर्षी प्रमाणे या वर्षी पिडीत मुलीचे आई वडील अत्याचार झालेल्या मुलीस आपल्या राजुरी गावात आजी आजोबांकडे शिक्षणासाठी ठेवून दिवाळी सण संपल्यानंतर ते सातारा जिल्ह्यातील कापसी येथील साखरकारखाण्यावर ऊसतोडणीसाठी गेले होते. पिडीत मुलगी ही गावातील इयत्ता ७ वी च्या वर्गात शिकत आहे. त्यांच्याच शेजारी रहाणारा आरोपी पिडीत मुलीच्या घरी येत आसत. याच वेळी घरी कोणी नसताना आरोपी बोरकर याने मुलीचे आई वडील साखर कारखान्यावर गेल्या पासून म्हणजे  ऑक्टोबर २०१७ पासून ते ९ मार्च २०१८ पर्यंत मुलीस जबरदस्तीने व जीवे मारुन टाकेल अशी धमकी देऊन वेळोवेळी बलात्कार केला.मुलीने सदरील घटना ही आपल्या आजी आजोबांना सांगितली यानंतर या अल्पवयीन मुलीस खाजगी दवाखान्यात दाखल केले असता ती गरोदर आसल्याचे ही डॉक्टरांनी सांगितले तसे फीर्यादी मध्ये म्हटले आहे.सदरची घटना मुलीच्या नातेवाईकांनी आर पी आय च्या महीला उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश च्या शांताबाई लोंढे यांना सांगितली यानंतर त्यांनी पिडीत मुलीस पोलीस स्टेशनला आणुन आरोपी विरोधात रीतसर तक्रार दाखल करण्यास सांगितले.या नंतर पिडीत मुलीच्या आजोबांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीच्या विरोधात जामखेड पोलिस स्टेशनला बलात्कार व बाललैंगिक आत्याचार प्रतिबंधात्मक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव सहारे हे करत आहेत. 

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.