बीडमध्ये साटंलोटं तरीही आरोग्य प्रशासनाचे हाताची घडी तोंडावर बोटं! हॉस्पीटल-सोनोग्राफी सेंटरवाल्यांची मिलिभगत कोणाच्या पथ्थावर?

बीड, (प्रतिनिधी):- शहरातील काही हॉस्पिटल आणि सोनोग्राफी सेंटरवाल्यांची सुरु असलेली मिलीभगत सामान्य रुग्णांना आर्थिक संकटाच्या खाईत लोटणारी आहे. आला रुग्ण की पाठवा सोनोग्राफी सेंटरकडे असाच काहीसा फंडा काही डॉक्टरांनी अवलंबविला आहे. हॉस्पिटल आणि सोनोग्राफी सेंटरवाल्यांच्या मिलीभगतचे आणि साटंलोटं असल्याचे संकेत मिळत असुन आरोग्य प्रशासनाची हाताची घडी आणि तोंडावर बोटं पहायला मिळत  आहे. यासर्व बिभत्स प्रकाराकडे वरिष्ठ दुर्लक्ष करीत असल्याने जनतेतून संताप व्यक्त केला जात आहे.
बीड शहर आणि परिसरात काही हॉस्पिटलमधील डॉक्टर मंडळी येथीलच काही सोनोग्राफी सेंटरवाल्यांना हाताशी धरुन सामान्यांची लूट करत असल्याचे प्रकार सुजान रुग्णांनीच चव्हाट्यावर आणले आहेत. एका सोनोग्राफी सेंटरवाल्याने प्रसुतीच्या तारखेत तफावत दाखवून कशाप्रकारे दिशाभूल केली याचा इरसाल नमुनाच समोर आणल्याने खळबळ उडाली आहे. हॉस्पिटल आणि सोनोग्राफी सेंटरवाल्यांची मिलीभगत असल्याचा झनझनीत पुरावा सामान्य रुग्णच देत असतांनाही आरोग्य प्रशासन या प्रकाराकडे दुर्लक्ष करीत आहे. वरिष्ठांकडून जाणिवपुर्वक दुर्लक्ष होत असल्याने सामान्यांना लुटणार्‍यांचे मनोबल आणखीनच वाढू लागले आहेत. दिवसाढवळ्या सामान्यांच्या खिशाला कात्री लावण्याचे काम काही मंडळी करीत असतांनाही जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी केवळ बघ्याची भुमिका घेत असल्याने संताप व्यक्त होत आहे. या सर्व प्रकाराकडे वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे असुन सोनोग्राफी सेंटरवाल्यांची आणि काही हॉस्पिटलधारकांच्या मिलीभगतचे थेट संकेत मिळत असतांनाही त्याकडे होणारे दुर्लक्ष कोणाच्या पथ्यावर आहे हे देखील लवकरच चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.