सावित्रीबाईं फुले - स्मृतिदिन

समाजात महिला पुरुष समानता प्रस्थापित करण्यासाठी महिला मुक्ति आंदोलनात सर्वस्व वाहून घेणारे भारतीय इतिहासातले महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले हे पहिले दाम्पत्य होय .महिला शिक्षणाच्या अग्रदुत आणि प्रणेत्या सावित्रीबाई यांचा आज स्मृतिदिन त्यानिमित्त त्यांना ही शब्दसुमने ....
दीडशे वर्षापूर्वी स्त्री पुरुष समानता व सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी चळवळ उभारून रुढी प्रिय समाज व्यवस्थेशी कड़वी झुंज कोणी दिली तर ती फुले दाम्पत्याने .बालविवाहाला विरोध करून ते थाम्बले नाहीत तर विधवांचा पुनरर्विवाह करण्याचे सामाजिक उत्तर दायित्व त्यानी मोठ्या हिकमतिने पार पाडले .विधवांच्या पुनर्विवाहास मान्यता मिळविण्यासाठी त्यांनी इंग्रज सरकारपुढे आग्रही मागणी केली आणि या सामाजिक कार्यात फुले दाम्पत्याना यश येऊन त्यास 1856 मध्ये मान्यता मिळाली .
शिक्षिका .लेखिका .कवयित्री .माता .समाजसेविका ..अशा विविध भूमिकेतून सावित्रीबाईंशी समाजातील गोरगरीब दुर्बल घटकांची सेवा करण्यात आपले सारे आयुष्य पणाला लावल .समाजातले स्त्री दायित्व मिट्विन्यासाठी स्त्रियांनी शिकून सवरुन स्वावलम्बी बनावे म्हणजे त्याना आपल्या खऱ्या शक्तिची ओळख होऊन पुरुषप्रधान समाजाची गुलामगिरी पत्करण्याची वेळ येणार नाही अस ठाम मत त्यांनी स्त्रियान्पुढे मांडले .
अद्ण्याण ..जातिभेद ..स्त्रीपुरुष भेदाभेद ..मिटवण्यासाठी फुले दाम्पत्यानी 1 जानेवारी 1848 रोजी पुणे येथे मुलींची पहिली शाळा सुरू केली ही शाळा पुढे भारतातील पहिली मुलींची शाळा म्हणून गणली गेली .ज्योतीरावांनी आपल्या पत्नी सावित्रीबाई यांची या शाळेत शिक्षिका म्हणून नियुक्ती केली .ज्योतीरावांनी सर्वप्रथम सावित्रीबाईंना शिक्षित केले आणि त्यांच्यात शिक्षिका होण्याची गुणवत्ता निर्माण केली .त्या पहिल्या भारतीय शिक्षिका म्हटल्या गेल्या .
फुले दाम्पत्यानि त्यानंतर नेटिव फीमेल स्कुल ..द सोसायटी फॉर प्रमोटिंग एजुकेशन ..या संस्था स्थापन केल्या .पाहता पाहता फुलेंनी पुणे शहर व परिसरात 20 शैक्षणिक संस्थांचे जाळे पसरवले .इतकेच नव्हे तर शाळेतील मुलांची गळती थाम्बविन्यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन भत्ता तसेच आवडेल ते शिक्षण देण्यावर भर दिला .19 व्या शतकात स्त्री शिक्षणात त्यांनी केलेली कामगिरी अद्वितीय ठरली .अभिरुचि संवर्धन व चारित्र्याची जडण घडण या गोष्टीकडे फुलेँच्या शाळांमध्ये कटाक्शाने लक्ष दिले जात असे .त्यामुळे फुले दाम्पत्यांचा शाळांमधील मुलींची संख्या सरकारी शाळेतील मुलांच्या संखेपेक्षा दहा पटीने वाढली .व गुणवत्तेतही सरस ठरली .परिणामी फूले दाम्पत्याचि शैक्षणिक क्षेत्रातील कामगिरी ची सर्व दूर प्रशन्शा झाली .
शैक्षणिक क्षेत्रातल्या भौतिक कार्याबद्दल 1852 मध्ये इंग्रज प्रशासनाने फुले दाम्पत्याचा समारम्भ
पूर्वक सत्कार केला ..ज्योतिरावांच्या समता ..सत्यपरायणता ..मानवता वाद ..या तत्वांचा अंगीकार करून त्यासाठी सावित्रीबाईंनी आपले सारे जीवन व्यतीत केले .शिक्षणाची महती गाताना सावित्रीबाई म्हणतात .
मुलींना शिकवा ..भेदाभेद हट्वा ..अस नुसतं सांगून जमायच नाही ....
शिक्षण देऊन शहाणे करायचे ..दुसरा काही उपायच नाही ....
जिच्या हाती पाळन्याची दोरी ..ती जगाते उद्धारी ..
या ऊक्तिस प्रत्यक्ष कृतीत उतरवून फुले दाम्पत्यानी मुलींच्या शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य दिले 1889 साली ज्योतीरावांच्या मृत्युनंतर त्यांच्या स्त्री शिक्षण स्त्री मुक्ति ..स्त्री पुरुष समानता या कार्यांना सावित्रीबाईंनी गती दिली .सावित्रीबाईंनी ज्योतीरावांना दिलेली साथ अजोड होती .त्यांच्या प्रत्येक कार्यात त्या सावली सारख्या त्यांच्या बरोबर असत .सेवा व करुणेचा आदर्श त्यांनी समाजापुढे ठेवला .हुन्ड्याशिवाय कमी खर्चात गोरगरीब दुर्बल घटकातील मुलींचा विवाह व्हावा यासाठी त्यांनी सत्यशोधक विवाहाची प्रथा सुरू केली .सर्वांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी स्वतःच्या घरातील हौद खुला करून जातिभेद निर्मुलनाच्या अभियानास चालना दिली .
अद्यापही सावित्रीबाई फुले यांचे कार्य पुर्ण झाले नसले तरी त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊनच महाराष्ट्र शासनाने मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या मुलींच्या शिक्षणासाठी विविध योजना राबवल्या आहेत ..मुलींनी शिक्षण घेऊन स्वतःचा ..कुटुम्बाचा व समाजाचा विकास साधावा म्हणजे हीच सावित्रीबाईना खरी श्रधांजली ठरेल ..
विजयकुमार राजाभाऊ गिरे
यशोदीप गुरुकुल बीड
मो 9921075359
Add new comment