शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर दोन दिवसापासून ठिय्या!

मागण्या तात्काळ मार्गी लावा नसता उपोषण सुरुच-भोसले, पठाण, डावकर
बीड, (प्रतिनिधी):- निराधारांच्या प्रश्‍नासह शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार यांच्या मागण्यासाठी राष्ट्रवादी कॉंगे्रसचे जिल्हा सरचिटणीस दिलीप भोसले, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष बरकत पठाण, भाऊसाहेब डावकर यांनी जिल्हाकचेरीसमोर काल दि.८ मार्च पासुन अमरण उपोषण सुरु केले आहे. आज उपोषणाचा दुसरा दिवस असुन आंदोलनकर्त्यांनी जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत अमरण उपोषण सुरुच ठेवणार असा ईशारा दिला आहे. या उपोषणाला जिल्हा परिषद सदस्य संदिप क्षीरसागर, फारुख पटेल, शिवाजी जाधव, रमेश चव्हाण, प्रभाकर पोपळे आदिंनी भेट दिली. प्रशासनाने उपोषणकर्त्यांशी पत्र व्यवहार करुन संबंधित अधिकार्‍यांना आठ दिवसाच्या आत मागण्यांची पुर्तता करावी असे लेखी पत्र दिले. मात्र या मागण्या जोपर्यंत मार्गी लागत नाही तोपर्यंत उपोेषण मागे घेणार नसल्याचे उपोषणकर्त्यांनी प्रशासनाला कळविले.
शेतकर्‍यांची सरसकट कर्जमाफी करा, बेरोजगारांसाठी पोलिस भरती आणि तलाठी पदाच्या जागा वाढवा, विविध महामंडळातील मुद्रा योजनेचे कर्ज राष्ट्रीयकृत बँकेमार्फत तात्काळ द्या, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर भिमसृष्टी उभारा, शहरातील आणि तालुक्यातील रखडलेला राशन कार्ड वाटपाचा प्रश्‍न तात्काळ मार्गी लावा, संजय गांधी, श्रावण बाळ योजनेतील ७ हजार प्रलंबित प्रकरणाची लाभार्थी मंजुरीची बैठक जाहीर करा, बीड शहरालगत असलेल्या संत नामदेव नगर, नरसोबा नगर, गांधीनगर, मोहंमदीया कॉलनी, दिलावरनगर, प्रकाश आंबेडकरनगर, एमआयडीसीतील नवनाथ नगर, सिद्धेश्‍वर नगर, पुरग्रस्त कॉलनी, गोरेवस्ती, बांगर नाला या भागातील दारिद्रय रेषेचा सर्व्हे करा तसेच इस्लामपुरा, मोमीनपुरा, जुनाबाजार, काझीनगर, जालना रोड, शाहूनगर या अल्पसंख्यांक भागात नागरी सुविधा उपलब्ध करुन द्या, अल्पसंख्यांक मुलींचे वस्तीगृह उभारा या मागण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्यावतीने जिल्हा सरचिटणीस दिलीप भोसले, अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष बरकत पठाण, भाऊसाहेब डावकर यांनी अमरण उपोषण सुरु केले आहे.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.