…आणि दिवाकर रावतेंनी मध्यरात्री केली प्रवाशांची सुटका

परळी । प्रतिनिधी

एक प्रवासी मध्यरात्री संकटात अडकतो. अडचणीत सापडलेला तो व्यक्ती मंत्र्यांना मदतीसाठी फोन करतो. मध्यरात्री मंत्रीमहोदय त्याचा फोन घेतात, आणि अवघ्या २० मिनिटात त्याची अडचणीत सुटका होते. हा कोणत्या चित्रपटामधला प्रसंग नाही, कोणती फँटसी नाही तर परळीच्या अनिरुद्ध जोशी यांना आलेला अनुभव आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी त्यांना मदत केली. त्यामुळे जोशींची अडचणीतून तात्काळ सुटका झाली. जोशी यांनी हा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला असून तो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
------------------------
काय घडला प्रसंग ?

अनिरुद्ध जोशी आणि त्यांचे एक मित्र औरंगाबादहून नगरला शिवनेरीहून निघाले होते. रात्री साडे दहा वाजता वाळूज परिसरात त्यांच्या गाडीला खासगी बसची धडक लागून अपघात झाला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या अपघातानंतर सर्व प्रवासी जागीच खोळंबले.
--------------------------
मध्यरात्री लावला फोन

परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संथ कारभाराला कंटाळून जोशी यांनी थेट परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना फोन लावला. मध्यरात्री बारा वाजता रावतेंनी हा सर्व प्रकार शांतपणे ऐकून घेतला. ‘रावतेंनी सर्वप्रथम झालेल्या प्रकाराबद्दल माफी मागितली आणि नंतर अधिकाऱ्यांना तातडीने सुचना केली. रावतेंच्या या सुचनेनंतर अवघ्या २० मिनिटात अश्वमेध गाडी घटनास्थळी दाखल झाली.’ असा अनुभव जोशी यांनी सांगितला आहे.

 ‘हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घडवलेला सच्चा सैनिक मी अनुभवला’अशी भावना जोशी यांनी व्यक्त केली आहे.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.