सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय झाला आहे, योग्य वेळी जाहीर करु; संजय राऊत यांचे वक्तव्य

मुंबई-शिवसेनेचा सत्तेतुन बाहेर पडण्याचा आमचा निर्णय झालेला आहे. आम्ही योग्य वेळी जाहीर करु, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. एनडीएतील घटकपक्ष टीडीपीने सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. एनडीएतले बहुतांश घटक पक्ष भाजपवर नाराज आहेत. एकेक करून सगळेच पक्ष बाहेर पडतील, अशी प्रतिक्रिया शिवसेनेने याबाबत दिली आहे.

 

टीडीपीच्या काही मागण्या मान्य न झाल्याने ते बाहेर पडले आहेत. अशातच आता शिवसेना सत्तेतून बाहेर कधी पडणार असा सवाल विचारला जातो आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपली भूमिका मांडली आहे. टीडीपीने जे केले, ते अपेक्षितच होते, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ‘टीडीपीने शिवसेनेकडूनच प्रेरणा घेतली. सत्तेला चिकटलेले मुंगळे एक एक करून सत्तेतून बाहेर पडतील. बाहेर पडण्याचा आमचा निर्णय झालेला आहे. आम्ही योग्य वेळी जाहीर करु’, असेही ते म्हणाले.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.