अन्याय अत्याचाराविरूध्द राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसचे मुक आंदोलन

बीड, (प्रतिनिधी):- महिलांवर होणारे अत्याचार आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. हुंडाबळी, कौटुंबिक अत्याचार, वरिष्ठ पदावर असणार्‍या महिलांवरील अत्याचार हे दिवसेंदिवस वाढत असून यामुळे महिला असुरक्षित असल्याचे म्हणत विनयभंग, बलात्कार यासारख्या गंभीर घटना दिवसेंदिवस वाढत असल्याचे राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षा रेखा फड यांनी निवेदनात म्हटले आहे. आज जिल्हा कचेरीसमोर मुक आंदोलन करून प्रशासनाला शिष्टमंडळाने निवेदन दिले. 
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आज जिल्हा कचेरीसमोर राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्यावतीने मुक आंदोलन करण्यात आले. यावेळी महिलावरील होणारे अन्यायर अत्याचार दुर करावे, हुंडाबळी, कौटुंबिक अत्याचार, मुलींची छेडछाड, विनयभंग, बलात्कार यासारख्या घटनांना आळा घालण्यासाठी प्रयत्न करावे या आशयाचे निवेदन राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षा रेखा फड यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. यावेळी आंदोलनात नंदा सारूक, जयश्री रणसिंग, मनिषा घुगे, कविता डोंगरे, शारदा उजगरे, मिनाक्षी शिंदे, सिमा उगडे यांच्यासह महिलांची उपस्थिती होती.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.