लाइव न्यूज़
निराधारांच्या प्रश्नावर राष्ट्रवादी कॉंग्रेस पदाधिकार्यांचे अमरण उपोषण
बीड, (प्रतिनिधी):- शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार, निराधार यांच्या प्रश्नासंदर्भात आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस दिलीप भोसले, राकॉं अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष बरकत पठाण, भाऊसाहेब डावकर यांनी जिल्हा कचेरीसमोर अमरण उपोषण सुरू केले आहे. विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना सुर्पुद करून मागण्या मान्य करा अशी विनंती केली आहे.
शेतकर्यांची सरसकट कर्जमाफी करून त्यांना बेबाकी प्रमाणपत्र वितरीत करा, सुशिक्षित बेरोजगारांसाठी पोलिस भरतीच्या जागा आणि तलाठी भरतीच्या जागा वाढून द्या, विविध महामंडळासहीत मुद्रा योजनेच्या कर्जाचे वाटप राष्ट्रीयकृत बँकेमार्फत तात्काळ सुरू करा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील भिमसृष्टीचे काम तात्काळ सुरू करा, बीड शहर आणि तालुक्यातील वर्षापासून रखडलेल्या राशन कार्डचे वाटप तात्काळ सुरू करा, संजय गांधी श्रावणबाळ योजनेतील ७ हजार प्रलंबीत प्रकरणाची लाभार्थी मंजूरीची बैठकीचा दिनांक जाहीर करा यासह विविध मागण्यांसाठी हे अमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. या उपोषणात दिलीप भोसले यांनी मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत अमरण उपोषण करण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे.
--
Add new comment