जळीत प्रकरणात सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल!

बीड, (प्रतिनिधी):- माजलगाव तालुक्यात चिंचगव्हाण येथील राधिका गुळकर या महिलेस सासरच्या मंडळीने घरात रॉकेल टाकून जाळल्याची घटना घडली होती. काल रात्री ९ च्या दरम्यान या महिलेची शासकीय रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी तिचा नवरा, सासरा, दोन दिर, भावजई यांच्यावर खुन केल्याचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया दुपारी उशिरापर्यंत सुरू होती.
माजलगाव तालुक्यातील चिंचगव्हाण येथील राधिका गुळकर या महिलेस ७ मार्च रोजी पहाटे ४ च्या सुमारास सासरच्या मंडळीने झोपेत असतांना अंगावर रॉकेल टाकत जाळण्याची घटना घडली होती. महिलादिनाच्या पुर्वसंध्येला घडलेल्या या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी विवाहित महिलेला गेवराई येथे प्राथमिक उपचारासाठी दाखल केले. परिस्थिती गंभीर असल्याने पुढील उपचरासाठी बीड येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. काल रात्री ९ च्या दरम्यान राधिका गुळकर हिचे दु:खद निधन झाले. याप्रकरणी सासरची मंडळी घटनास्थळावर पसार झाली होती. राधिका हिचे निधन झाल्याने सासरच्या मंडळीवर खुनाचा गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया दुपारी उशिरापर्यंत सुरू होती.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.