जमिअत उलेमाच्यावतीनेही मराठा आरक्षणासंदर्भात समितीला निवेदन
बीड, (प्रतिनिधी):मराठा समाजाच्या सर्वांगीण मागासलेपणाच्या आधारे या समाजाला आरक्षण देण्यात यावे अशा मागणीचे निवेदन जमिअत उलेमा महाराष्ट्र बीड शाखेच्यावतीने राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांना देण्यात आले. मराठा समाजाचे ९० टक्क्यापेक्षा अधिक लोक परंपरेने शारिरीक श्रमाचे काम करुन स्वत:चा उदरनिर्वाह करतात. बहुतांश समाज ग्रामीण भागात वास्तव्य करीत आहे. राज्यातील मराठा समाज सामाजिकदृष्ट्या अत्यंत मागास असुन मराठा समाजाला आरक्षण देवून त्यांना सामाजिक प्रवाहात आणावे अशी मागणी जमिअतच्यावतीने करण्यात आली. निवेदनावर हाफेज महंमद जाकेर, मोईन मास्टर, फारुख पटेल, ऍड.शेख शफिक, मुफ्ती अतिकुररहेमान कासमी, मौलाना अब्दुल बाकी, काझी शफिक, शाहेद पटेल, मौलाना इलियास खान, अलिम पटेल, शेख महंमद रफिक, हाफिक जुनेद, हाजी नसीम इनामदार, खदीरभाई ज्वारीवाले आदिंच्या स्वाक्षर्या आहेत.
Add new comment